‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत अबुधाबीहून ५७ प्रवासी गोव्यात दाखल

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत ३९ वे तसेच अबुधाबी ते गोवा दरम्यानचे पहिले विमान आज पहाटे गोव्यात दाबोळी विमानतळावर ५७ प्रवासी घेऊन दाखल झाले.

दाबोळी: ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत ३९ वे तसेच अबुधाबी ते गोवा दरम्यानचे पहिले विमान आज पहाटे गोव्यात दाबोळी विमानतळावर ५७ प्रवासी घेऊन दाखल झाले.

भारत सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत अबुधाबीमध्ये अडकलेल्या प्रवाशांना घेऊन काल पहाटे पाच वाजता हे विमान दाखल झाले. दुबईस्थित गोमंतकीय कन्या विशांती कवठणकर खासकरून गोमंतकीयांना गोव्यात येण्यास सहकार्य करीत आहेत.

त्यामुळे अबुधाबीमध्ये असलेल्या गोमंतकीयांना गोव्यात येण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. गेले सात महिने विशांती कवठणकर यांनी अनेकांना गोव्यात परतण्यासाठी सहकार्य केलेले आहे. परवा मध्यरात्री अबुधाबीहून गोव्यात येण्यासाठी विमान निघाले व ते काल पहाटे दाबोळी विमानतळावर पोहोचले. एकूण ५७ प्रवासी या विमानातून दाखल झाले. 

आणखी वाचा:

लिओनेल मेस्सी बार्सिलोनाकडेच  राहणार; नेमारही परत आल्यास  क्‍लबची आर्थिक स्थिती सुधारण्याचा दावा -

संबंधित बातम्या