
पणजी : बिकानेर - राजस्थान येथून गोव्यात झटपट पैसा कमावण्यासाठी आलेल्या ओमप्रकाश बिर्मलराम तर्ड (29) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्याच्याकडून सुमारे 6 किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटात 6 लाख रुपये असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांनी दिली.
म्हापसा येथील नव्या बसस्थानकाजवळ पेट्रोल पंपच्या समोर एक तरुण संध्याकाळच्या सुमारास ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखे पोलिसांना मिळाली होती. या बसस्थानकाच्या परिसरात पर्यटकांची मोठी वर्दळ असल्याने गांजाची विक्री करत होता. त्याला काल (रविवारी) संध्याकाळी उशिरा हिरव्या रंगाची पिशवी घेऊन संशयास्पद फिरत असताना साध्या वेशातील पोलिसानी हटकले व त्याची झडती घेतली.
त्याच्याकडे असलेल्या पिशवीतील पदार्थाची तपासणी केली असता तो गांजा असल्याचे आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची प्राथमिक चौकशी केली असता त्याला हा गांजा एका व्यक्तीने दिल्याचे सांगितले. मात्र त्याचे नाव माहीत नाही, असे सांगून गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अटक करून अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.