Cansaulim: सेंट थॉमस हायस्कूलने तरुणांना मानवतेची खरी मूल्ये शिकवली

कासावली येथील सेंट थॉमस हायस्कूलची 60 वर्षे केली पुर्ण
Cansaulim  High School
Cansaulim High SchoolDainik Gomantak

वास्को: कासावली येथील सेंट थॉमस हायस्कूलची 60 वर्षे साजरी केली. फादर रॉबर्ट बॅरेटो यांनी 1962 मध्ये स्थानिकांसाठी सदर हायस्कूलची स्थापना केली होती. या हायस्कूलच्या षष्ठपूर्ती कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून या हायस्कूलचे माजी विद्यार्थी, तथा फादर लुसियो डायस उपस्थित होते.

(60 years since the establishment of St. Thomas High School at Cansaulim)

या कार्यक्रमावेळी बोलताना हायस्कूलने आपल्या तरुणांना मानवतेची खरी मूल्ये आत्मसात करण्याचे शिकवल्याबद्दल तसेच हायस्कूलचे विद्यार्थी पुढे जाऊन डॉक्टर, अभियंते, आर्किटेक्ट, उद्योजक इत्यादी बनवले. त्याबद्दल त्यांनी शाळेच्या भूतकाळातील आणि वर्तमान व्यवस्थापनाची प्रशंसा केली.

Cansaulim  High School
MGPचे माजी आमदार लवू मामलेदार करणार TMC मध्ये प्रवेश

हायस्कूलचे माजी व्यवस्थापक फादर सेन्टोरिया रॉड्रिग्स, फादर जिन दा क्रूज फर्नांडिस आणि वर्तमान व्यवस्थापक फादर लव मारिया अफोन्सो व मुख्याध्यापिका श्रीमती अरोरा डिसोजा यांनी यांच्या या विद्येच्या मंदिराशी असलेल्या संबंधाबद्दल सांगितले.

Cansaulim  High School
Goa Politics: पक्षांतरावर सुदिन ढवळीकर म्हणतात ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’

या हायस्कूलचे माजी विद्यार्थी ओरविल्ले दोरादो रोड्रिक्स व ओलांस्यो सीमाईस यांनी या शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त करताना या शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी आपल्या समाजाचे समाधानसंपन्न सदस्य बनले आहे. अशा शब्दात त्यांनी आपल्या भाषणात शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी भूतपूर्व व विद्यमान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा फादर लुसिओ डायस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com