म्हापशात २ दिवसांत ६२ रूग्णांना कोरोनाची लागण

team dainik gomantak
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

रविवारी व सोमवारी मिळून म्हापसा शहरात ६२ कोरोना रूग्णांची नोंद झाली. तर आज म्हापसा बाजारपेठेतील एका व्यापाऱ्याचा कोरोनाने बळी घेतला आहे.

म्हापसा- शहरात कोरोना महामारीचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यास आरोग्य खात्यांसह  सरकारी यंत्रणेला अपयश आले आहे. रविवारी व सोमवारी मिळून म्हापसा शहरात ६२ कोरोना रूग्णांची नोंद झाली. तर आज म्हापसा बाजारपेठेतील एका व्यापाऱ्याचा कोरोनाने बळी घेतला आहे.

म्हापसा परिसरातील शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये व महाविद्यालयांतील अनेक शिक्षक, प्राध्यापक व शैक्षणिक संस्थेतील कर्मचारवर्ग दररोज पॉझिटिव्ह होत आहेत. सरकार आपले अपयश लपवण्यासाठी शैक्षणिक संस्थांवर दबाव टाकत आहेत. कॉलेजच्या प्राचार्यांवर राजकीय दबाव आणून दहावी, बारावी व महाविद्यालये सुरू करण्यामुळे महाविद्यालयाच्या नऊ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे.

सद्यस्थितीत बार्देश तालुक्यात १९९४ कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये पर्वरी येथे सर्वात जास्त तर कोलवाळमध्ये त्याहून थोडे कमी रूग्ण आहेत. खोर्ली ९, करासवाडा ५, कुचेली ९, शेट्येवाडा पेडे १४, शेळपे ३, आगड १, आल्तीन ४, डांगी कॉलनी १, पोलिस ठाणे ३, अशी एकूण कोरोना रूग्णांची संख्या आहे.       

संबंधित बातम्या