Goa Cyber Crime: 214 सायबर गुन्ह्यांपैकी केवळ 62 प्रकरणांचा तपास लावण्यात यश

गोव्यात दुसरीकडे कुठल्याच शहरात सायबर विभाग सुरू करण्याचा सध्या मानस नाही
Cyber crime
Cyber crime Dainik Gomantak

मागील साडे सात वर्षात गोव्यातील विविध पोलिस ठाण्यात एकूण 214 सायबर गुन्हे (Cyber Crime) दाखल झाले. त्यापैकी एकूण 62 प्रकरणांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून, इतर प्रकरणांचा तपास सुरू आहे. अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दिली. आमदार विरेश बोरकर (Viresh Borkar) यांनी याबाबत लेखी प्रश्न विचारला होता.

गोव्यात 2015 साली 21, 2016 आणि 2017 साली 14, 2018 साली 35, 2019 साली 18, 2020 साली 41, 2021 साली 38, 30 जून 2022 पर्यंत 33 असे एकूण 214 सायबर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 62 प्रकरणांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून, इतर प्रकरणांचा तपास सुरू आहे. असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

बोरकर यांनी त्यालाच जोडून विचारलेल्या उपप्रश्नात 2017 ते आत्तापर्यंत दक्षिण गोव्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती मागितली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी 2017 साली 14, 2018 साली 35, 2019 साली 18, 2020 साली 41, 2021 साली 38, 30 जून 2022 पर्यंत 33 सायबर गुन्हे दाखल झाले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Cyber crime
Goa Taxi : टॅक्‍सीचालकांना अडचणीत आणू नका

रायबंदर सायबर क्राईम विभागात किती पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. आणि दुसरीकडे कोणत्या शहरात सायबर विभाग सुरू करण्याचा विचार आहे. अशी माहिती विरेश बोरकर यांनी मागितली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत यांनी रायबंदर सायबर क्राईम विभागात दोन पोलिस निरिक्षक, दोन उपनिरिक्षक, दोन सहाय्यक पोलिस निरिक्षक, एक हेड कॉन्सटेबल आणि 16 पोलिस कॉन्सटेबल कार्यरत आहेत. पोलिस कर्मचा-यांना सायबर विभागाचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच, गोव्यात दुसरीकडे कुठल्याच शहरात सायबर विभाग सुरू करण्याचा मानस नाही. अशी माहिती दिली.

Cyber crime
Vishwajit Rane : फार्म हाऊस धोरणात बदल करणार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com