कोरोनाचे सर्वाधिक ६२१ पॉझिटिव्‍ह; सहा बळी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

आरोग्य सेवा संचालनालयाच्यावतीने जाहीर झालेल्या आकडेवारीत आज दिवसभरात २ हजार ६०८ एवढ्या लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले गेले. त्यात १ हजार ५०२ जण निगेटिव्ह आले.  ६२१ जण पॉझिटिव्ह आले, तर ४८५ जणांच्या चाचण्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

पणजी: राज्यात आज ६२१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आजवरची ही सर्वाधिक संख्‍या आहे. तसेच मागील चोवीस तासांत सहाजणांचा बळी गेला. बळींची एकूण संख्या २६२ वर पोहोचली आहे.

आरोग्य सेवा संचालनालयाच्यावतीने जाहीर झालेल्या आकडेवारीत आज दिवसभरात २ हजार ६०८ एवढ्या लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले गेले. त्यात १ हजार ५०२ जण निगेटिव्ह आले.  ६२१ जण पॉझिटिव्ह आले, तर ४८५ जणांच्या चाचण्यांचा अहवाल येणे बाकी आहे. प्रकृती सुधारामुळे २८१ जण घरी परतले. २२४ जण घरगुती आयसोलेशन होऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे असा उपचार घेणाऱ्यांची संख्या ८ हजार २११ वर पोहोचली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ८३३ वर पोहोचली आहे. आज मृत्‍यू झालेल्‍यांत फोंडा येथील ३३ वर्षीय पुरुष, नावेली येथील ५७ वर्षीय पुरुष, पेडणे येथील ६५ वर्षीय महिला, फातोर्डा येथील ८७ वर्षीय महिला, कुडतरीतील ७५ वर्षीय पुरुष आणि एक अज्ञाताचा समावेश आहे.

चर्चिलना दोन दिवसांत डिस्चार्ज
कोरोनामुळे दोनापावल येथील खासगी रुग्णालयात दाखल झालेले राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांना येत्या दोन दिवसांत डिस्चार्ज मिळू शकतो. परंतु, एम्सच्या डॉक्टरांच्या सूचनेमुळे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना आणखी काही दिवस ऑक्सिजनवर ठेवावे लागेल, असे त्या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या