राज्यात कोरोनाचे आणखी ७ मृत्यू

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

राज्यात आज आणखी सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू झाले. यातील सहा मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आणि एक इएसआय रुग्णालयात झाला. ज्यामुळे आजवर मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा ५३८ इतका झाला आहे. आज दिवसभरात ४२५ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत तर ३०९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पणजी :  राज्यात आज आणखी सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू झाले. यातील सहा मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आणि एक इएसआय रुग्णालयात झाला. ज्यामुळे आजवर मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा ५३८ इतका झाला आहे. आज दिवसभरात ४२५ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत तर ३०९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या ३८२७ इतके सक्रिय कोरोना रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. राज्याचा रिकव्हरी रेट ८९.१९ टक्के इतका आहे. 

दरम्यान आतापर्यंत ३६ हजार ३५ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. तर १९ हजार नऊशे सोळा रुग्णांनी होम आयसोलेशनचा मार्ग स्वीकारला आहे. आज दिवसभरात १६० रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला. आज दिवसभरात ६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णलयात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत २ लाख ८० हजार सातशे तीन लोकांच्या चाचण्या राज्यात करण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात १४०८ चाचण्या करण्यात आल्या. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात ४६९ इतकी खाटांची संख्या आहे तर यातील २५० खाट रिकामे आहेत. दक्षिण गोव्यात १००६ इतकी खाटांची संख्या आहे तर यातील ७३८ खाट रिकामे आहेत. 

साखळी आरोग्य केंद्रात १८६, पेडणे आरोग्य केंद्रात १०१, वाळपई आरोग्य केंद्रात १०७, म्हापसा आरोग्य केंद्रात २०८, पणजी आरोग्य केंद्रात २१४, कांदोळी आरोग्य केंद्रात १६८, खोर्ली आरोग्य केंद्रात १२४, चिंबल आरोग्य केंद्रात २५३, पर्वरी आरोग्य केंद्रात ३००, मडगाव आरोग्य केंद्रात २९८, फोंडा आरोग्य केंद्रात २४७ इतक्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

संबंधित बातम्या