कोरोनाचे आणखी ७ बळी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

राज्यात काल आणखी सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह मृत्यूंची संख्या ६१६ वर पोहचली आहे. काल १८६ लोकांना कोरोनाची लागण झाली असून २०८ जण कोरोनमुक्त झाले आहेत.

पणजी : राज्यात काल आणखी सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह मृत्यूंची संख्या ६१६ वर पोहचली आहे. काल १८६ लोकांना कोरोनाची लागण झाली असून २०८ जण कोरोनमुक्त झाले आहेत. सध्या राज्यात दोन हजार दोनशे पंधरा इतके सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ९३.५६ टक्के असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. 

आज जे मृत्यू झाले, त्यातील ५ मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथे आणि बाकीचे २ इएसआय इस्पितळ, मडगाव येथे झाले. यामध्ये डिचोली येथील ६४ वर्षीय पुरुष, ७३ वर्षीय महिला, चोडण येथील ६७ वर्षीय पुरुष, कुंक्कळी येथील ७३ वर्षीय पुरुष, म्हापसा येथील ७५ वर्षीय महिला, कुठठाळी येथील ५७ वर्षीय पुरुष आणि मडगाव येथील ५९ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. 
दरम्यान, १३९२ जणांच्या लाळेचे नमुने तपासण्यात आले. आज ३५ लोक इस्पितळात उपचारासाठी भरती झाले तर ११३ लोकांनी होम आयसोलेशनचा मार्ग स्वीकारला. उत्तर गोव्यामध्ये सध्या कोरोना उपचारासाठी १९९ खाटा, तर दक्षिण गोव्यात ३०१ खाटा शिल्लक असल्याची माहिती मिळाली. 
सध्याच्या घडीला डिचोली आरोग्य केंद्रात ६६ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात ७३ रुग्ण, पेडणे आरोग्य केंद्रात ४० रुग्ण, पणजी आरोग्य केंद्रात १३० रुग्ण, कोलवाळे आरोग्य केंद्रात ११० रुग्ण, पर्वरी आरोग्य केंद्रात १२० रुग्ण,मडगाव आरोग्य केंद्रात २१५ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्रात १२७ रुग्ण, लोटली आरोग्य केंद्रात ४२ रुग्ण आणि तसेच इतर आरोग्य केंद्रात रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती मिळाली.

संबंधित बातम्या