Goa Carnival 2023: कार्निव्हल मिरवणुकीसाठी बाणावलीत 7 गाव एकत्र

मिरवणुकीचे आयोजन करण्यासाठी बाणावली, कोलवा, वार्का, केळशीसह इतर गावच्या प्रतिनिधींची निवड करण्यात आली
Goa Carnival 2023
Goa Carnival 2023Dainik Gomantak

Goa Carnival 2023: बाणावली मतदारसंघातील सात गावांनी एकत्र येऊन मतदारसंघात पारंपरिक कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक आयोजित केली आहे.

21फेब्रुवारीपासून ही मिरवणूक होणार असून त्याची तयारी सुरू करण्यात आल्‍याची माहिती आमदार व्हेंझी व्‍हिएगस यांनी दिली.

या मिरवणुकीसाठी प्रत्येक गावचा एक प्रतिनिधी निवडण्यात येणार आहे. या परेडला यापूर्वी स्थानिक युवकांचा सहभाग असलेला युनायटेड बॉईज्‌ ऑफ बाणावली क्लबचा पाठिंबा असेल.

किनारपट्टी भागात कार्निव्हल परेडची परंपरा कायम राखण्यासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे व्‍हिएगस यांनी सांगितले.

स्थानिक पेले फर्नांडिस यांनी सांगितले की, कार्निव्हल केवळ फ्लोट्ससाठीच नव्हे तर समुदाय एकत्र येऊन कार्यक्रमाचा आनंद कसा घ्यायचा यासाठी आहे.

दरम्‍यान, या मिरवणुकीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी बाणावली, कोलवा, वार्का, केळशीसह इतर ठिकाणच्या गावच्या प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com