Bicholim : 70 ‘लाडली लक्ष्मी’ ना डिचोली येथे मंजुरीपत्रे

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी लाभार्थी युवती, महिलांना ''लाडली लक्ष्मी''च्या मंजुरी पत्रांचे वाटप केले.
Bicholim
BicholimDainik Gomantak

''लाडली लक्ष्मी'' योजनेखालील डिचोली मतदारसंघातील प्रलंबित 70 अर्ज मंजूर झाले आहेत. रविवारी (ता.22) डिचोली येथे आयोजित खास कार्यक्रमात आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी लाभार्थी युवती, महिलांना ''लाडली लक्ष्मी''च्या मंजुरी पत्रांचे वाटप केले.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, मुळगावचे उपसरपंच विशालसेन गाड आदी उपस्थित होते. सरकारच्या महिला आणि बाल विकास कल्याण खात्यातर्फे ''लाडली लक्ष्मी'' योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अर्थसहाय्य मिळण्यासाठी डिचोली मतदारसंघातील लाडली लक्ष्मींनी केलेले अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत होते.

Bicholim
Coal Transport: ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कोळसा- दाजी साळकर

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या प्रयत्नातून अखेर 70 प्रलंबित अर्ज मंजूर झाले आहेत. महिलांसाठी सरकार विविध योजना राबवित आहे. या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा. असे आवाहन आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी यावेळी बोलताना केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com