Fire In Goa: आगीच्‍या 72 घटना, हेलिकॉप्‍टर्सच्‍या 42 खेपा

वणव्यांचा आढावा : सूक्ष्म घटकांवरही लक्ष; पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न
Goa Fire
Goa FireDainik Gomantak

Fire In Goa: सह्याद्रीतील म्हादई वन्यजीव अभयारण्यासह अनेक अभयारण्यांत 4 ते 14 मार्चदरम्यान लागलेल्या आगीच्‍या 72 घटनांचा वन खात्याच्या वतीने बारकाईने आढावा घेतला जात आहे.

नौदल, वायुदल, अग्निशमन, वन खाते आणि स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या मदतीमुळे आग आटोक्यात येऊ शकली असली तरी जैवविविधतेची झालेली हानी आणि आगीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वन खात्याचे निकरीचे प्रयत्न सुरू आहेत.

आगीवर नियंत्रण आणण्‍यासाठी २ हेलिकॉप्‍टर्सना ४२ फेऱ्या माराव्‍या लागल्‍या. जंगलांना लागणारे वणवे हे वन्यजीव अभयारण्यांसाठी मरण यातना असतात. हजारो वर्षांची जैवविविधता काही क्षणात भक्ष्‍यस्‍थानी पडते. शेकडो, हजारो जीव आगीत होरपळून मरतात. काहींच्या तोंडचा घास हिरावला जातो.

त्यामुळे जंगली जनावरांवर उपासमारीची पाळी येते. परिणामी ते मानवी लोकवस्तीत आश्रय घेण्याचा आणि शेतजमिनीत घुसण्याचा प्रयत्न करतात. हे सारे होत असले तरी वणवे कसे लागले? कोणी आणि का लावले? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

म्हादई अभयारण्यासह मोले राष्ट्रीय उद्यान, भगवान महावीर उद्यान, नेत्रावळी अभयारण्य आदी अनेक ठिकाणचे खासगी जंगल 4 ते 15 मार्चपर्यंत लागलेल्या आगीमुळे जळून खाक झाले. आता वन खात्याच्या वतीने या प्रकरणांची चौकशी आणि आढावा घेणे सुरू झाले आहे.

अनेक ठिकाणी लागलेली आग, जळलेला भूभाग, आगीचे स्वरूप, आग लागली की कोणी लावली?, भक्षस्थळी पडलेल्या वनस्पती, झाडे-झुडपे, गवतवर्गीय वनस्पतीचे नुकसान, प्राणी-पक्षी व सरपटणारे प्राणी यांच्यावर झालेला परिणाम, आग विझविण्यासाठी केलेले प्रयत्न, स्थानिकांची मदत, सरकारी पातळीवरची मदत, आग विझविण्यासाठी लागलेला वेळ, पुनरावृत्ती टाळण्यासाठी केलेले प्रयत्न, जनजागृती अशा अनेक बाजूने या प्रकरणांचा आढावा घेण्याचे काम सुरू झाले आहे.

Goa Fire
H3N2: राज्‍यात ‘एच3-एन2’चा शिरकाव; आढळले 2 रुग्‍ण

दोन लाख लिटर पाण्‍याचा वापर

जंगलात आगीच्या 72 घटना समोर आल्या आहेत. आगीवर नियंत्रण ठेवणे अग्निशमन दल आणि कर्मचाऱ्यांच्या हाताबाहेरचे असल्याचे लक्षात आल्यानंतर नौदलाला पाचारण करण्यात आले. नौदल आणि हवाई दलाने अथक प्रयत्न केले.

यासाठी सुमारे 2 लाख लिटर पाण्‍याचा वापर करण्यात आला. हवाई दलाची 2 हेलिकॉप्टर्स साधारणपणे 40-42 तास आग विझवित होते. त्यांच्या यासाठी 42 फेऱ्या झाल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक सौरभ कुमार यांनी दिली. याबाबतचा आढावा लवकरच पूर्ण होईल असेही ते म्हणाले.

Goa Fire
Vasco News: रेल्‍वे कामगारांवर दगडफेक

वणव्यांमागे मोठे कटकारस्थान :

जंगलामध्ये लागलेल्या वणव्यांमागे मोठे कटकारस्थान आहे. जंगलातील जमिनी बळकावल्या जाऊ शकतात. त्यामुळेच कदचित भू-माफियांनी हे कृत्य केले असावे. उष्णतेमुळे या भागात आग लागण्याची शक्यता कमीच आहे. असा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com