‘डीडीएसएसवाय’चे ७८ टक्के लाभार्थ्यांकडून नूतनीकरण

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

डीडीएसएसवाय योजनेखाली नवीन कार्ड करणाऱ्या कुटुंबियांसाठी ही सेवा सुरू असेल मात्र नुतनीकरण उद्यापासून (१ सप्टेंबर) बंद होणार आहे. सरकारने नूतनीकरणाची मुदत वाढविली नसली तरी त्या वाढवावी यासाठी प्रस्ताव पाठवणार आहे. या योजनेपासून कोणीही कार्डधारक वंचित राहू नये व त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न राहणार आहेत. - डॉ. बी. व्ही पै. ‘डीडीएसएसवाय’ प्रमुख

पणजी: दिनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेखाली (डीडीएसएसवाय) राज्यातील १ लाख ९० हजार कुटुंबियांनी (७८ टक्के) या योजनेचे नूतनीकरण केले आहे. ३१ ऑगस्ट ही नूतनीकरणासाठी शेवटची तारीख होती. या योजनेखाली राज्यातील २ लाख ४२ कुटुंबियांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे या योजनेखालील विम्यासाठी अजूनही ५२ हजार कुटुंबियांनी नूतनीकरण केले नसल्याने ते या योजनेसाठी मुकणार आहेत.  

‘डीडीएसएसवाय’चे प्रमुख डॉ. बी. व्ही पै यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेंतर्गत सरकारी इस्पितळात व सरकारच्या यादीतील निवडक खासगी इस्पितळात डीडीएसएसवाय कार्डमार्फत मोफत उपचार उपलब्ध करण्यात येतात. या योजनेचे नूतनीकरण १ जुलैपासून सुरू केले होते व ३१ ऑगस्ट हे शेवटची तारीख होती. त्यामुळे या योजनेच्या कार्डधारकांना नूतनीकरणासाठी २ महिन्यांची मुदत दिली होती. हे नूतनीकरण ऑनलाईन पद्धतीने तसेच प्राथमिक आरोग्य किंवा नियुक्त केलेल्या केंद्राच्या ठिकाणी जाऊन करण्याची सोय ठेवण्यात आली होती. या मुदतीमध्ये आतापर्यंत १.९० लाख कार्डधारकांनी नूतनीकरण केले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या