सासष्टी तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्याच्या प्रकरणात वाढ

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

सासष्टी तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्याची प्रकरणे वाढत असून सासष्टी तालुक्यातील पाच पोलिस ठाण्यात सरत्या वर्षाला आतापर्यंत ८ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत. ​

सासष्टी: सासष्टी तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्याची प्रकरणे वाढत असून सासष्टी तालुक्यातील पाच पोलिस ठाण्यात सरत्या वर्षाला आतापर्यंत ८ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ६ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले असून उर्वरित दोन गुन्ह्यांचा छडा लावण्यास पोलिसांना अद्याप यश मिळाले नाही. अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणात सर्वाधिक शालेय विद्यार्थ्यांनी असल्याचे पोलीस तापसकामात निष्पन्न झाले आहे. 

मायणा कुडतरी, कोलवा, कुंकळ्ळी, मडगाव आणि फातोर्डा ही पाच पोलीस स्थानके सासष्टी तालुक्याच्या हद्दीत येत असून या पाचही पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ८ गुन्हे आतापर्यंत नोंद झालेले आहे. सासष्टी तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणा संदर्भात आलेल्या सर्व तक्रारी दाखल करून गुन्हा नोंद करण्यात आलेला असून या अपहरण प्रकरणातील बहुतांश संशयिताना अटकही करण्यात आला, असा दावा पोलिसांनी केला आहे. 

सासष्टी तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे सर्वाधिक गुन्हे मायणा कुडतरी पोलीस नोंद झाले आहेत. या पोलीस ठाण्यात तीन गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी दोन प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. फातोर्डा पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या दोन गुन्ह्यांपैकी एक प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. मडगाव पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे आतापर्यंत दोन गुन्हे नोंद झाले असून पोलिसांना दोन्हीही गुन्ह्यांची उकल करण्यास यश आहे. कुंकळ्ळी पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या एक गुन्ह्याचा छडा लावण्यास पोलिसांनी यश आले आहे. कोलवा पोलिस ठाण्यात आतापर्यंत अपहरणाची एकही नोंद झालेली नाही.  

फातोर्डा आणि मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणाचा छडा लावण्यास  छडा लावण्यास पोलिसांना यश आलेले नाही. पण, या प्रकरणाचा उकल करण्यासाठी दोन्हीही पोलीस स्थानके प्रयत्न करीत आहेत. या अपहरणामागे हात असलेल्या संशयितांना अटक करण्यासाठी पोलिसांनी शेजारील राज्याला संपर्क करून सूचित केले आहे. दक्षिण गोव्यात सुरुवातीच्या नऊ महिन्यात  अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे १८ गुन्हे नोंद झाले होते यातील १४ प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे.

संबंधित बातम्या