राज्यात कोरोनाचे चोवीस तासांत आठ बळी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

राज्यात आज कोरोनाचे आणखी आठ बळी गेले. ज्यामुळे राज्यातील आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या ६१६ वर पोहचली आहे. आज राज्यात १८३ कोरोनाग्रस्त सापडले तर २४९ जण कोरोनमुक्त झाले आहेत.

पणजी : राज्यात आज कोरोनाचे आणखी आठ बळी गेले. ज्यामुळे राज्यातील आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या ६१६ वर पोहचली आहे. आज राज्यात १८३ कोरोनाग्रस्त सापडले तर २४९ जण कोरोनमुक्त झाले आहेत. ज्यामुळे राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २१३५ इतकी आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९३.७८ टक्के इतका आहे. 

आज ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यामध्ये सावंतवाडी येथील ६० वर्षीय पुरुष, म्हापसा येथील ६५ वर्षीय पुरुष, उसकई येथील ७६ वर्षीय महिला, नावेली येथील ६७ वर्षीय पुरुष, केरी सत्तरी येथील ४२ वर्षीय पुरुष, चिंबल येथील ६० वर्षीय महिला, नावेली येथील ५५ वर्षीय पुरुष आणि रत्नागिरी येथील ६२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यातील आज ५ मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयात, २ मृत्यू मडगाव येथील इएसआय रुग्णालयात आणि दक्षिण गोवा इस्पितळात एक मृत्यू झाला आहे. 

गेल्या चोवीस तासात १८८१ चाचण्या करण्यात आल्या. आज १२५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला तर ३३ रुग्णांना इस्पितळात भरती करण्यात आले. राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अजून खाट शिल्लक आहेत. उत्तर गोव्यात १८८ खाट तर दक्षिण गोव्यात ३२१ खाट शिल्लक आहेत.
डिचोली आरोग्य केंद्रात ५२ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात ७३ रुग्ण, पणजी आरोग्य केंद्रात १४६ रुग्ण, कांदोळी आरोग्य केंद्रात १०५ रुग्ण, चिंबल आरोग्य केंद्रात १४९ रुग्ण, मडगाव आरोग्य केंद्रात १७३ रुग्ण, वास्को आरोग्य केंद्रात १०६ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्रात १२१ रुग्ण आणि नावेली आरोग्य केंद्रात ५१ रुग्ण कोरोनाच्या उपचारासाठी भरती आहेत.

सलग सहाव्या दिवशी देशात उपचाराधीन रुग्णसंख्या सहा लाखांहून कमी रोगमुक्तीच्या दराने ९२ टक्केचा टप्पा ओलांडला. कोविड-१९ मधून बरे होणाऱ्यांची दरदिवशी वाढती संख्या  आणि मृत्यूदरातील घट यामुळे भारताची कोविड रुग्णसंख्येतील घट नोंदवण्याकडे स्थिर वाटचाल सुरु आहे. सलग सहाव्या दिवशी, आज उपचाराधीन रुग्णांची संख्या सहा लाखांहून कमी नोंदली गेली. भारतात आज  ५,३३,७८७  जण बरे झाल्याचे नोंदवले गेले. देशातील एकूण बाधित रूग्णांपैकी उपचार सुरू असलेले रुग्ण फक्त ६.४२ टक्के एवढेच आहेत. १६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात दर दशलक्षामागील बाधित रूग्णांची सरासरी राष्ट्रीय सरासरीहून कमी आहे.

संबंधित बातम्या