धक्कादायक.!; अवघ्या आठ महिन्यांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

१६ तासांआधी रुग्णालयात दाखल झालेल्या चिमुकलीला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले आहे. कोरोनामुळे सर्वात कमी वयाच्या रुग्णाचा मृत्यू होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.  

पणजी-  राज्यात आज एक धक्कादायक घटना घडली आहे. शिरवई-केपे येथील अवघ्या आठ महिन्यांची मुलीला कोरोनामुळे आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. १६ तासांआधी रुग्णालयात दाखल झालेल्या चिमुकलीला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले आहे. कोरोनामुळे सर्वात कमी वयाच्या रुग्णाचा मृत्यू होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.  

मागील चोवीस तासांत ८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यातील ५ जणांचा गोमेकॉत, तर तिघांचा मडगावच्या ईएसआय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या आठ बळींमुळे राज्यातील कोरोना बळींची संख्या ४६८ (सोमवारची संख्या ४६०) वर पोहोचली आहे. २४ तासांतील मृतांमध्ये सांतइस्तेव येथील ४९ वर्षीय पुरुष, मोरजी- पडणे येथील ५० वर्षीय पुरुष, कुर्टी-फोंडा येथील ६२ वर्षीय पुरुष, शिरवई- केपे येथील ८ महिन्यांची मुलगी, खोर्जुवे येथील ४६ वर्षीय महिला, नागाव येथील ७५ वर्षीय महिला आणि वास्को येथील ६१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
 

संबंधित बातम्या