कोरोनामूळे कोकण रेल्वेला फटका; आठ विशेष रेल्वेगाड्या बंद

दैनिक गोमंतक
मंगळवार, 11 मे 2021

आठ विशेष रेलगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. 

सासष्टी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेले लॉकडाऊन (Lockdown) अनलॉक केल्यानंतर कोकण रेल्वेने काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सेवा सुरू केली होती, पण, कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona Second Wave) पहिल्या लाटेपेक्षा अधिक विद्ध्वंसक होत चालल्याने प्रवाशांकडून रेल्वे प्रवासाला योग्य प्रतिसाद मिळणे बंद झाला आहे. कोकण रेल्वेने सुरू केलेल्या काही प्रवासी विशेष रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या असून प्रवासी कमी झाल्याने कोकण रेल्वेला पुन्हा आर्थिक फटका बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे.(8 trains of Konkan Railway canceled due to corona)

मुख्यमंत्र्यांना गोव्यापेक्षा महाराष्ट्रातील नागरिकांचीच जास्त काळजी

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीवर नियंत्रण येत असल्यामुळे कोकण रेल्वेने बंद केलेल्या रेलगाड्यांबरोबर काही विशेष रेलगाड्या सुरू केल्या होत्या, पण कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू झाल्याने अनेक राज्यात लॉकडाऊन तसेच कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. कोरोना व्हायरस हा स्पर्शातून तसेच संपर्कात आल्याने पसरत असल्यामुळे प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास करणे बंद केले असून याचा थेट फटका कोकण रेल्वेला बसलेला आहे, अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क विभागाचे ज्येष्ठ व्यवस्थापक बबन घाटगे यानी दिली.

कडक निर्बंधांचा सकारात्मक परिणाम; डिचोलीत  ''कोविड'' सक्रिय...

प्रवाशांनी खबरदारी म्हणून रेल्वे आरक्षण रद्द केले असून ज्या प्रवाशांनी बुकिंग केलेले आहे त्यांची रक्कम परत करण्यात येणार आहे, असे बबन घाटगे यांनी सांगितले. कोकण रेल्वे मार्गावरील मंगला, नेत्रावती, त्रिवेंद्रम राजधानी, डुरांडो, गोवा एक्स्प्रेस, कोकण कन्या, मांडवी, मंगलोर एक्सप्रेस व प्रवासी रेलगाड्या सध्या सुरू असून आठ विशेष रेलगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. 

 

संबंधित बातम्या