राज्य सरकारी खात्यांची ८० टक्के संकेतस्थळे बंद

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना प्रशासन चालविण्यास पूर्णपणे अपयश आले आहे. आपले अपयश लपविण्यासाठी अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यामध्ये कामचुकारपणा दाखविण्याचा प्रयत्न करीत नेहमी इतरावर आरोप करणे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बंद करावेत, अशी मागणी आम आदमी पक्षाचे गोवा संघटक राहुल म्हांबरे यांनी आज म्हापसा येथे पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

म्हापसा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना प्रशासन चालविण्यास पूर्णपणे अपयश आले आहे. आपले अपयश लपविण्यासाठी अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यामध्ये कामचुकारपणा दाखविण्याचा प्रयत्न करीत नेहमी इतरावर आरोप करणे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बंद करावेत, अशी मागणी आम आदमी पक्षाचे गोवा संघटक राहुल म्हांबरे यांनी आज म्हापसा येथे पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सुमारे ८० टक्के सरकारी खात्याचे संकेतस्थळे बंद असून अद्ययावत ती करण्यात आली नाही. याला जबाबदार आहे सरकार मुख्यमंत्र्यांनी भूमीपुत्रांना मदत करण्याचे सोडून बाहेरून येणाऱ्या लोकाना मदत केली आहे. बाहेरच्या लोकांना काम दिल्यामुळे अशा प्रकारच्या घटना होत राहणार, असा आरोप म्हांबरे यांनी केला.

गोव्यात कोविड १९ चा मृत्यूदर जास्त आहेत. अजूनही रुग्णवाहिका उपल्ब्ध नाहीत. लोक कोरोनाची भीती न बाळगता आपल्या मर्जीनुसार वागत आहेत. त्यामुळे काही कोरोना रुग्ण उशिरा इस्पितळात दाखल होत आहेत. मायना कुडतरी पोलिस स्थानकात जमीन घोटाळ्याची चौकशी सुरू झाली. गोमंतकीयाच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी गोमंतकीय जनतेसाठी काम करावे अदानीसाठी नव्हे. प्रशासनात शिस्त आणावी व दुसऱ्यांना दोषी ठरविण्याचे प्रकार बंद करावे, अशी मागणी आपचे गोवा निमंत्रक राहुल म्हाबंरे यांनी केली.
 

संबंधित बातम्या