गोव्यात दिवसभरात कोरोनाचे ८१ रुग्ण

दैनिक गोमन्तक
रविवार, 10 जानेवारी 2021

राज्यभरात गेल्या २४ तासात दोघांचा मृत्यू कोविडमुळे झालाज्यभरात आज ८१ कोविडचे नवे रुग्ण आढळले. आज २ हजार २०७ नमून्यांची चाचणी करण्यात आली.

पणजी: राज्यभरात गेल्या २४ तासात दोघांचा मृत्यू कोविडमुळे झाला. यात गोवावेल्हा येथील ५८ वर्षीय पुरुषाचा आणि कुडचडे येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश असल्याची माहिती सरकारी पत्रकातून देण्यात आली आहे. दोघांचाही मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरू असताना झाला.

दरम्यान, राज्यभरात आज ८१ कोविडचे नवे रुग्ण आढळले. आज २ हजार २०७ नमून्यांची चाचणी करण्यात आली. गेल्या २४ तासात ८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. २४ तासात ३६ जणांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले तर ७३ जणांनी गृह अलगीकरणास पसंती दिली आहे. सध्या राज्यभरात कोविडचे एकूण ८६७ रूग्ण आहेत.

संबंधित बातम्या