केपेत 11 ग्रामपंचायतींसाठी 81मतदान केंद्रे सज्ज

निर्वाचन अधिकारी प्रताप गावकर यांनी शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीचीही तयारी सुरू केली आहे.
Panchayat Elections in Goa
Panchayat Elections in GoaDainik Gomantak

केपे: केपे तालुक्यातील एकूण 11 पंचायतींच्‍या निवडणुकीसाठी 81 मतदानकेंद्रावरील तयारी पूर्ण झाली असून निर्वाचन अधिकारी प्रताप गावकर यांनी शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीचीही तयारी सुरू केली आहे. 11 पंचायतींमधील आंबावली येथील एक मतदानकेंद्र सवेदनशील म्हणून घोषित केले आहे.

(81 polling stations ready for 11 Gram Panchayats in Quepem Town)

Panchayat Elections in Goa
मतदारसंघांतील मंत्र्यांची तटस्थ भूमिका! पाच मंत्र्यांच्या बालेकिल्ल्याकडे लक्ष

कावरे पंचायतीमधील तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून बाकी उमेदवारांचे भवितव्य उद्या सीलबंद होणार आहे. सदर निवडणूक पक्षीय पातळीवर लढवली जात नसली तरी केपेचे माजी आमदार बाबू कवळेकर व आमदार एल्टन डिकॉस्‍टा यांनी आपले उमेदवार जिंकून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. फातर्पा पंचायतीच्या प्रभाग दोनमधून आमदार एल्टन यांचे बंधू संझिल डिकॉस्‍टा व कवळेकर यांच्या कट्टर समर्थक व माजी सरपंच मेदिनी नाईक यांच्यामध्ये खरी लढत असून सर्वांच्या नजरा या प्रभागाकडे लागल्या आहेत.

सांगे मतदारसंघातील मळकर्णे पंचायतीतील पाच प्रभागांत सरळ लढत होणार असून आमदार सुभाष फळदेसाई यांनी आपल्या उमेदवारांसाठी घरोघरी जाऊन प्रचार केल्याने या निवडणुकीला बरीच रंगत येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com