Bodgeshwar Jatra: अबब! जत्रोत्सव फेरीतून जमला 92 टन कचरा

म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर देवस्थानच्या बारा दिवसांच्या जत्रोत्सवाच्या फेरीतून तब्बल 92 टन कचऱ्याची निर्मिती झाली.
Bodgeshwar Jatra |waste
Bodgeshwar Jatra |waste Dainik Gomantak

Bodgeshwar Jatra: म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर देवस्थानच्या बारा दिवसांच्या जत्रोत्सवाच्या फेरीतून तब्बल 92 टन कचऱ्याची निर्मिती झाली. हा सर्व कचरा म्हापसा पालिकेकडून वेळेत उचलण्यात आला.

जत्रेच्या फेरीस्थळावरुन सुमारे 90 टनापेक्षा जास्त कचरा म्हापसा पालिकेने उचलला. यासाठी पालिकेस बऱ्याच कर्मचारी आणि वाहनांचा वापर करावा लागला. फेरीला दिलेल्या मुदतीत हटवण्यापासून वेळेत कचरा उचलून आम्ही परिसराचे विद्रूपीकरण होण्यापासून रोखले, अशी प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर यांनी दिली.

Bodgeshwar Jatra |waste
Goa Tourism: रात्री 10नंतर संगीतावर बंदी आणल्याने पर्यटनावर गंभीर परिणाम

यंदा देव बोडगेश्वर देवस्थानची जत्रेनिमित्त फेरी 12 दिवस चालली. या जत्रोत्सवातील फेरीमध्ये हजारहून जास्त तात्पुरते स्टॉल्स उभारले होते. तर पन्नासच्या आसपास केळी व फुले विक्रेते होते. या सर्वांकडून दर दिवसा सुमारे सहा टन कचऱ्याची निर्मिती व्हायची. यात प्रत्येकी तीन टन ओल्या तसेच सुक्या कचऱ्याचा समावेश आहे.

म्हापसा पालिकेकडून ओला कचरा गोळा करण्यासाठी जत्रेतील फेरीच्या ठिकाणी 50 किलो क्षमतेच्या कचरा पेट्यांची व्यवस्था केली होती. तसेच सुका कचरा ठेवण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. बारा दिवस जत्रोत्सवातून पालिकेने ओला व सुका मिळून अंदाजे 72 टन कचऱ्याची उचल करून पालिकेच्या कचरा प्रकल्पात त्यावर प्रक्रिया केली.

Bodgeshwar Jatra |waste
Pilerne Fire: ‘बर्जर’हटाओ; साळपे गाव बचाओ!

दुकाने हटली,पण कचरा तिथेच !

15 रोजी जत्रा संपल्यानंतर सोमवारी 16 रोजी पालिकेने फेरीतील सर्व दुकाने हटवली. ही दुकाने स्वतःहून हटविताना दुकानदारांनी दुकानात निर्माण झालेला मोठ्या प्रमाणात कचरा तेथेच टाकून दिलेला. त्यामुळे जत्रेच्या पटांगणावर प्लास्टिक कचऱ्याचा खच विखुरलेला दिसत होता.

म्हापसा पालिकेने सोमवार (ता.16) ते बुधवार (ता.18) असे तीन दिवस अतिरिक्त कामगार वापरून हा संपूर्ण कचरा साफ केला. काही सामाजिक संस्थांनी पालिकेला सहकार्य केले. यातून 20 टन सुका कचरा गोळा करून तो पालिकेच्या कचरा प्रकल्पात नेऊन टाकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com