मुरगावात कोरोनाचे ९३ सक्रिय रुग्‍ण

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

मुरगाव तालुक्यात कोरानाचे आता केवळ ९३ सक्रिय रुग्ण आहेत. देशभर कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हा मुरगाव तालुक्यात हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती.

मुरगाव : मुरगाव तालुक्यात कोरानाचे आता केवळ ९३ सक्रिय रुग्ण आहेत. देशभर कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हा मुरगाव तालुक्यात हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती.

दिवसेंदिवस ही संख्या वाढतच होती, त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली होती. कोरोनामुळे गोव्यात झालेला पहिला मृत्यू मुरगाव तालुक्यातीलच होता. आतापर्यंत मृत्यू संख्या ७०० पार झाली आहे, त्यात सर्वाधिक मृत्यू मुरगाव तालुक्यातील आहेत. तथापि, आरोग्य खात्याने खबरदारी घेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यास थोडेफार यश मिळविल्याने ऐन पर्यटन मोसमात आणि वर्ष अखेरीस मुरगाव तालुक्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ९३ पर्यंत खाली आली आहे.

आणखी वाचा:

सागरमाला प्रकल्पासाठी गोव्यातील देशांतर्गत जलवाहतुकीला ‘ग्रीन’ सिग्‍नल -

संबंधित बातम्या