दाबोळी विमानतळावर 95 लाखांचे सोने जप्त 

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

दाबोळी विमानतळावर आज कस्टम अधिकाऱ्यांनी सुमारे 95 लाखांचे सोने जप्त केले. याप्रकरणी एका प्रवासाला ताब्यात घेण्यात आले आहे.

दाबोळी :  दाबोळी विमानतळावर आज कस्टम अधिकाऱ्यांनी सुमारे 95 लाखांचे सोने जप्त केले. याप्रकरणी एका प्रवासाला ताब्यात घेण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत हे सोने दुबई येथून आणण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दुबई ते गोवा व्हाया दिल्ली या विमानातून हे सोने आणले गेले होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद केंद्राचे उद्घाटन

दुबई ते दिल्ली प्रवास केलेल्या प्रवाशाने हे सोने तो बसलेल्या आसनाच्या खाली लपवून ठेवले होते. तो दिल्लीला उतरला व त्यानंतर त्याच आसनावर दिल्ली येथे विमानात दुसरा प्रवासी बसला व त्याने हे सोने दाबोळी येथे उतरल्यावर तस्करी करण्याच्या प्रयत्न असताना सापडला. एप्रिल 2020 पर्यंत कस्टम अधिकाऱ्यांनी सुमारे 1.11 कोटींचे सोने जप्त करण्यात आले आहे.

‘आप’चा स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना पाठिंबा

संबंधित बातम्या