Margao municipal elections : मडगावात 98 उमेदवार रिंगणात 

Margao municipal elections : मडगावात 98 उमेदवार रिंगणात 
Margoa Municipal Corporation

मडगाव : मडगाव पालिका निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांपैकी 17 जणांनी आज आपले अर्ज मागे घेतल्याने 98 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. प्रभाग 24 मध्ये सर्वाधिक 9 उमेदवार असून 2. 5, 14, 16, 19 व 21 या सहा प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन उमेदवार असल्याने या प्रभागांमध्ये थेट लढती होणार आहेत. 

मडगाव पालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये माजी नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा, घनश्याम शिरोडकर, डोरीस टेक्सेरा, पुजा नाईक, गोंझाक रिबेलो यांच्यासह माजी नगरसेवक दामोदर शिरोडकर, दामोदर रामनाथ नाईक,  मनोज मसुरकर, राजू (हॅडली) नाईक, राजू नाईक, सदानंद नाईक, जाॅनी क्रास्टो, अ‍ॅजेलिस परेरा, लिंडन परेरा, रामदास हजारे, माजी  नगरसेविका बबिता नाईक यांचा समावेश आहे. माजी मंत्री लुईस आलेक्स कार्दोझ यांच्या कन्या विवियाना कार्दोझ, माजी आमदार कृष्णनाथ नाईक यांचे पूत्र सुनील नाईक, माजी आमदार व स्वातंत्र्य सैनिक गजानन रायकर यांचे पूत्र पराग रायकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांची कन्या रोनिता आजगावकर , भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य शर्मद पै रायतुरकर,  क्रिकेटपटू वासुदेव कुंडईकर व पत्रकार प्रतिक वासुदेव परब हेही निवडणूक रिंगणात आहेत. 

प्रभागवार उमेदवार पुढीलप्रमाणे :

प्रभाग 1 - मॅकेन्झी मायकल डिकाॅस्ता, मिलाग्रीस फर्नांडिस, फ्रान्सिस जोआन्स, रेन्झील मास्कारेन्हस, गोंझाक रिबेलो,  प्रभाग 2  जाॅनी क्रास्टो, कालिदास (काली) नाईक, प्रभाग 3 फातिमा बारेटो, झिको फर्ऩांडिस, लिंडन परेरा, रेश्मा सय्यद, सेऊला वाझ, प्रभाग 4 पुजा नाईक, आॅलिंडा कार्दोझ राॅड्रिग्ज, जेसी वाझ, पुष्पा वासुदेव विर्डीकर, प्रभाग 5 दीपश्री श्रीराम कुर्डीकर, श्वेता सुजय लोटलीकर, प्रबाग 6 योगेश नागवेकर, प्रविण नाईक, सदानंद नाईक, विराज नाईक, प्रभाग 7 आर्थुर डिसिल्वा, कुस्तोदिया डायस, मिलाग्रीना गोम्स, राॅयस्टन गोम्स. प्रबाग 8 कामिल बारेटो, साल्वादोर फ्रान्सिस मिरांडा, मिलाग्र (मिलू) नोरोन्हा, प्रबाग 9 रोशल फर्नांडिस, महादेव (रामदास) हजारे, नर्मदा विद्देश कुंडईकर, आगुस्तिन मिरांडा, रविंद्र (राजू) नाईक, ओलिवेरा मानुएल, विन्सेन्ट परेरा, प्रभाग 10 रजत कामत, वासुदेव कुंडईकर, ज्योकीम राॅड्रिग्ज, वितोरिनो तावारीस, प्रभाग 11 जया जयप्रकाश आमोणकर, राजू नाईक, अ‍ॅजेलिस परेरा, राजीव रवाणे, अन्वर सय्यद, प्रभाग 12 व्लेम फर्नांडिस, स्वप्नील जुवारकर, सगुण (दादा) नाईक, शर्मद पै रायतुरकर, प्रभाग 13 सिता संदीप नाईक, अ‍ॅड, स्नेहल वसकर, शुभांगी सुतार, डोरीस टेक्सेरा, मोनालिझा विन्सेन्ट, प्रभाग 14 रोनिता राजेंद्र आजगावकर सुलक्षा सुभाष जामुनी, प्रभाग 15 महेश आमोणकर, फेबियान कुतिन्हो, उदय देसाई, मनोज मसुरकर, शेख इफ्तिकार, लिंकन वाझ, प्रभाग 16 अनिशा मोहन नाईक, दिपाली दिगंबर सावळ, प्रभाग 17 सिताराम गडेकर, देविका कारापूरकर, राधिका कारापूरकर, प्रभाग 18 रोहन नाईक, घनश्याम प्रभू शिरोडकर, पराग गजानन रायकर, प्रभाग 19 मंगला हरमलकर, लता पेडणेकर, प्रभाग 20 शामिन बानू, सॅंड्रा फर्नांडिस, पोमा राजेश केरकर, आलिन्डा राॅड्रिग्ज, 

प्रभाग 21 दामोदर (सचिन) सातार्डेकर, दामोदर बाबल शिरोडकर, प्रभाग 22 दामोदर रामनाथ नाईक, सुनील कृष्णनाथ नाईक, दामोदर विठ्ठल वरक, प्रभाग 23 विवियाना कार्दोझ, निमिशा फालेरो, नादिया वाझ, प्रभाग 24 राजेंद्र बांदेकर, शिग्गाव उस्मान अहमद खान, प्रितम मोराटगीकर, जितेंद्र नाईक, सत्यन नाईक गावणेकर, प्रतिक वासुदेव परब, पार्वती शंकर पराडकर, राजू (हॅडली) शिरोडकर, अदीश उसगावकर, प्रभाग 25 आस्मा बी, बबिता नाईक, शेख कुलसूम  बी, अपुर्वा आनंद तांडेल

अर्ज मागे घेतलेले 17 उमेदवार - 

सुकुर फर्ऩांडिस, सईद जहुर (प्रभाग 1), वासुदेव विर्डीकर (प्रभाग 2), मोहिद्दीनसाब उंटावाले (प्रभाग 3), जानुआरिया फुर्तादो (प्रभाग 5), रामचंद्र रेडकर (प्रभाग 6), मिलशाॅन डायस, रुझारियो मदेरा (प्रभाग 7), ज्योकीम बारेटो, लिवरामेंत बारेटो (प्रभाग 8), विद्देश कुंडईकर, साईनाथ कुट्टीकर (प्रभाग 9), साईप्रसाद नाईक (प्रभाग 10), शेख आबेदीन (प्रभाग 11), दिपाली जामुनी (प्रभाग 14), सिल्वेस्टर कुतिन्हो (प्रभाग 15), रेश्मा राजू शिरोडकर (प्रभाग 24)   

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com