सासष्टीतून तब्बल 994 उमेदवारी अर्ज दाखल

अनेक माजी पंच सरपंच रिंगणात
Salcete Gram Panchayat Election
Salcete Gram Panchayat ElectionDainik Gomantak

मडगाव: सासष्टी तालुक्यातील 33 पंचायतीतून तब्बल 994 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून बारदेस तालुक्यानंतर याच तालुक्यातील उमेदवारांची संख्या सर्वात जास्त आहे. बार्देस तालुक्यातही 33 पंचायती असून त्या तालुक्यात 1263 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. ( 994 candidatures filed in Salcete Gram Panchayat Election 2022 )

Salcete Gram Panchayat Election
दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतूक कोंडी, पोलिसांची दमछाक

आज शेवटच्या दिवशी सासष्टी तालुक्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मडगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांची गर्दी पडली होती. अनेक माजी सरपंच व पंच सदस्यांनी आज आपले अर्ज भरले त्यात राय पंचायतीच्या माजी सरपंच मिलाग्रीना फेर्नांडिस, झेवीयर फेर्नांडिस, वेर्णाचे माजी सरपंच रेमी फेर्नांडिस तसेच बेतालभाटी येथील माजी सरपंच कॉस्तासीयो मिरांडा यांचा समावेश होता.

Salcete Gram Panchayat Election
गुळेली ग्रामपंचायत प्रभाग एक मधून अक्षिता गावडे बिनविरोध

चढाओढ वाढणार

आज अखेरच्या दिवशीपर्यंत निवडणूकीत तब्बल 994 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामूळे यात आजी - माजी स्थानिक नेते आपली राजकीय ताकद वापरून ही निवडणूक लढणार आहेत. त्यामूळे तालूक्यात विजयी होण्यासाठी अटी - तटीच्या लढती होणार असे चित्र आहे. आणि या चढाओढीत नावाजलेल्या उमेदवारांना कोणत्या ही निकलाला सामोर जाण्यास लागू शकते. उद्या या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 27 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे.

महालवाडा,पैंगीण पंचायतीची निवडणूक बिनविरोध

पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात राजकिय वातावरण चांगलेच तापले असताना पैंगीण पंचायतीच्या महालवाडा येथे मात्र थोडी वेगळी स्थिती आहे. कारण या वार्डातून सुनील पैंगणकर बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विरूद्ध एकही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com