कोलवा सर्कलजवळ चालत्या बीएमडब्ल्यू गाडीला आग

रोहन कारेकर यांच्या मालकीची ही बीएमडब्ल्यू गाडी असून तो सुरावली मडगावच्या दिशेने जात असताना, कोलवा सर्कलजवळ पोहचल्यावर अचानक धूर यायला सुरुवात झाली.
कोलवा सर्कलजवळ चालत्या बीएमडब्ल्यू गाडीला आग
बीएमडब्ल्यू गाडीला (To the BMW car) भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी 2 वाजता घडली. Dainik Gomantak

सासष्टी: मडगाव येथील कोलवा सर्कल परिसरात (In the area of Colva Circle at Madgaon) चालत्या बीएमडब्ल्यू गाडीला (To the BMW car) भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी 2 वाजता घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, ही गाडी आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. गाडीला रस्त्यावरच आग लागल्याने वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. या गाडीला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

बीएमडब्ल्यू गाडीला (To the BMW car) भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी 2 वाजता घडली.
Goa: मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात पिडितेचा वर्षभर अमानुष छळ

रोहन कारेकर यांच्या मालकीची ही बीएमडब्ल्यू गाडी असून तो सुरावली मडगावच्या दिशेने जात असताना, कोलवा सर्कलजवळ पोहचल्यावर अचानक धूर यायला सुरुवात झाली. चालकाच्या लक्षात ही बाब आल्यावर गाडी उभी करुन तो गाडीतून बाहेर आला. त्यानंतर काही क्षणातच गाडीने पेट घेतला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी गाडीतील कागदपत्रे तसेच संपूर्ण गाडीच जळून खाक झाली.

बीएमडब्ल्यू गाडीला (To the BMW car) भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी 2 वाजता घडली.
Goa: महिलांच्या संरक्षणात गोवा सरकार अपयशी

आग लागलेली ही बीएमडब्ल्यू गाडी रस्त्यावरच असल्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण झाली. आग लागल्याची माहिती अग्नी शामक दलाच्या जवानांना मिळताच त्वरित घटनास्थळी पोहचण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोंडीमुळे अग्नीशामक दलाच्या गाडीला घटनास्थळी पोहचण्यास उशिर झाला. पोलिसांनी मार्ग सुरळीत केल्यावर अग्नीशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आग विझविली. गाडीला आग लागण्याचे नेमके कारण तसेच या आगीत किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com