Panaji Accident: जुने सचिवालय येथे कारचा अपघात, महिला जखमी

Car accident at Panaji
Car accident at Panaji Dainik Gomantak

पणजी येथील जुने सचिवालय (Accident at Panajim) येथे कारचा अपघात झाला आहे. यामध्ये वास्को येथील एक महिला जखमी झाली आहे. आज (२७ जुलै) सकाळी हा अपघात घडला. राधा राणे हेनरीक (वय २३, रा. वास्को) असे या जखमी महिलेचे नाव आहे. महिलेला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

पणजीत मागील काही दिवसांपासून अपघातांचे सत्र पहायला मिळत आहे. थोड्याच दिवसांपूर्वी अटल सेतूवर झालेल्या अपघातात पोलीस कॉन्स्टेबलने आपला जीव गमावला होता. त्यानंतर आज सकाळी कार अपघाताची ही घटना समोर आली आहे.

Car accident at Panaji
गौरी आचारी खून प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात

ट्रॉलर मालकाल १.२४ कोटी रूपयांचा गंडा

एका ट्रॉलर मालकाची मासळी खरेदीच्या नावाखाली १.२४ कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली आहे. संशयित आरोपी मालिम जेटी वरून उडपी येथे मासळी घेऊन जात होते असा संशय आहे. दरम्यान, मोहम्मद हफिम आणि एम युसूफ (रा. उडपी, कर्नाटक) यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com