रंगीता एंटरप्रायझेसवर गुन्हा; अनेकांना घातला गंडा

16 कोटींचा घोटाळा: अनेकांना घातला गंडा
रंगीता एंटरप्रायझेसवर गुन्हा; अनेकांना घातला गंडा
Fraud CaseDainik Gomantak

फातोर्डा: राज्यातील अनेक ग्राहकांना गंडा घातलेल्या रंगीता एन्टरप्रायझेस या आस्थापनाविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. या आस्थापनाने 2 हजार ग्राहकांना एकंदरीत 16 कोटी रुपयांचा गंडा घेतला आहे. यातील 9.33 कोटी रुपये गोव्यातील ग्राहकांचे पैसे आहेत.

(A case has been registered against Rangita Enterprises for cheating customers)

Fraud Case
राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले?

आर्थिक गुन्हा विभागीय पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांनी हे प्रकरण नोंद करून घेतले आहे. सध्या नावेली येथे राहत असलेले व मूळ वडोदरा-गुजरात येथील गोहिल जयकुमार, आगोंद येथील स्वीझल फर्नांडिस, मडगावमधील मुईद माधवानी, वास्कोतील लमाजी लमाणी, मडगाव-पाजीफोंड येथील मरीन माधवानी, वडोदरा-गुजरात येथील आरती कश्यप हे या प्रकरणीतील संशयित संशयित आहेत. संशयितांवर भा. दं. स. 406, 409, 420, 120 व गोवा प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझीटर्स ॲक्ट 1999च्या 3, 5 कलमाखाली तसेच प्राईस चिट ॲण्ड मनी सर्क्युलेशन स्कीम (बर्निंग ) ॲक्टच्या 4 व 5 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Fraud Case
बलात्कार आणि खूनप्रकरणी तुरुंगात असणाऱ्या विकटसाठी ड्रग्सचा पुरवठा

80 हजारांच्या आश्वासनाला पडले बळी

संशयित आरोपींनी जुलै 2021 ते जून 2022 दरम्यान गोव्यातील गुणवंतूक दारांकडून 9.33 कोटी रुपये घेऊन त्यांना गंडा घातला आहे. रंगीता एन्टरप्रायझेस या आस्थापनाची स्थापना करून या संशयित आरोपींनी दर आठवड्याला 20 टक्के व्याज देण्याचे सांगून गोव्यातील गुणवंतूकदारांकडून पैसे घेतले होते. यात किमान 1 लाख रुपये गुणवंतूकदाराला 80हजार रुपये देण्याचे आश्वसन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून गोव्यातील अनेक ग्राहकांनी आपले पैसे गुंतविले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com