Morjim Beach: मोरजीतील 'मार्बेला रिसॉर्ट'वर गुन्हा दाखल; अनेकांचे धाबे दणाणले

ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल
Morjim Beach
Morjim BeachDainik Gomantak

मोरजी: गावडेवाडा-मोरजी येथील मार्बेला बीच रिसॉर्टमध्ये काल रात्री संगीतरजनी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयाने रात्री दहा वाजेपर्यंत परवाना दिला असताना रात्री 10 नंतरही पार्टी सुरू राहिल्याने पोलिसांनी बंद पाडली होती. या रिसॉर्ट आता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक रिसॉर्ट मालकांचे धाबे दणाणले आहेत.

(A case has been registered against the Marbella Beach Resort in Morjim)

Morjim Beach
Purple Fest 2023: गोव्यात प्रथमच दिव्यांगांसाठी राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेचे आयोजन

मिळालेल्या माहितीनुसार पेडणे पोलिसांनी 163/2022 पर्यावरण संरक्षण कायदा आणि ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम कायद्याचे उल्लंघन केल्याने मोरजी येथील मार्बेला बीच रिसॉर्टवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक र. राजेश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी पेडणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Morjim Beach
Goa: केरी-तेरेखोल फेरीधक्का नागरिकांसाठी ठरतोय धोकादायक!

पोलिस प्रशासनाने याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, मारबेला बीच रिसॉर्ट मालकाने मोरजी येथे दिनांक 3 डिसेंबर रोजी रात्री दहा नंतर संगीत पार्टी आयोजित केल्याचे स्पष्ट झाले आहे. निर्बंध असतानाही कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. तसेच परवानगी न घेता ध्वनिप्रदूषण आणि मर्यादेपलीकडे संगीत वाजवून स्थानिकांना त्रास दिला आहे, त्यामुळे हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com