ANC Raid at Arambol: हरमल येथे अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळल्या

ग्राहकाच्या प्रतिक्षेत असताना केली कारवाई
Drug Accused Arrested by porvorim police
Drug Accused Arrested by porvorim policeDainik Gomantak

हरमल येथे एक व्यक्ती अमली पदार्थासह ग्राहकाच्या प्रतिक्षेत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गोवा पोलिसांनी अमली पदार्थ पुरवठा करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका कायम ठेवला असून आज पुन्हा हरमल येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे.

( A drug peddler has been arrested by the ANC in Arambol )

मिळालेल्या माहितीनुसार आज कल्पेश द्विरेदी (27) हा युवक हरमल येथे दोन ते तीन प्रकारचे अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत कल्पेश द्विरेदी (27) या मध्य प्रदेशातील युवकाला अटक केली आहे.

Drug Accused Arrested by porvorim police
Vijai Sardesai On Mhadei: ...अन्यथा बार्देश, सांगेचा पाणीप्रश्न पेटणार

कारवाईदरम्यान हरमल पोलिसांनी संशयिताची तपासणी केली असता त्याच्याकडून 20.60 ग्रॅम मेथॅम्फेटामाइन, 11.45 ग्रॅम एक्स्टसी पावडर, 4.10 ग्रॅम एलएसडी द्रव आणि 50 ग्रॅम चरस जप्त केले आहेत. याची बाजारात याची किंमत सुमारे 7.45 लाख रुपये आहे.

Drug Accused Arrested by porvorim police
Joseph Sequeira: ‘बिल्डर्स’पासून समुद्रकिनारे वाचवा!

याबाबत पोलिसांनी माहिती देताना म्हटले आहे की, संशयित हा किनारी पट्ट्यात ग्राहकांना अमली पदार्थ पुरवत होता. हे चक्र बरेच दिवस सुरु आहे. असे स्पष्ट झाले आहे. आरोपी आता गजाआड झाला असून यामागे साखळी आहे का? याचा तपास सुरु आहे. तसेच संशयितावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com