Goa Accident : कुंकळ्ळीत मासळीवाहू ट्रक पुलावरुन खाली कोसळला

चालकाला सुखरुप बाहेर काढण्यात यश; उस्कीनीबांध पांझरखण येथील घटना
A fish carrying truck fell down from the bridge in cuncolim goa
A fish carrying truck fell down from the bridge in cuncolim goaDainik Gomantak

Goa Accident : गोव्यात अपघातांचं सत्र अजूनही थांबताना दिसत नाही. झुआरी पुल दुर्घटनेच्या आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एक अशीच घटना कुंकळ्ळी परिसरातून समोर आली आहे. एक मासळीवाहू ट्रक पुलावरुन खाली कोसळून अपघात झाला आहे. ट्रक चालकाला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आलं असलं तरी रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कुंकळ्ळीतील उस्कीनीबांध पांझरखण येथे रात्री उशिरा हा अपघात झाला आहे.

A fish carrying truck fell down from the bridge in cuncolim goa
कॅसलरॉक-करंझोळ दरम्यान रेल्वे डबा घसरला

प्राथमिक माहितीनुसार काल रात्री पडत असलेल्या पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या बाहेर गेलेला मासळीवाहू ट्रक उक्सिणीबांध - पांझरखणी येथे शेतात कोसळला.

कुंकळ्ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा ट्रक मडगावहून कारवार येथे जात होता. या अपघातात कुठल्याही प्रकारची प्राणहानी झाली नाही. आत अडकलेल्या चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र ट्रकचे या अपघातात मोठे नुकसान झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com