Watch Video: गोवेकर & पर्यटक दोघांत हाणामारी, पणजीत भर रस्त्यात झाला राडा

रस्त्याच्या शेजारी लावलेला बॅरिगेटरच रस्त्याच्या मधोमध लावण्यात आला व या पर्यटक व्यक्तीची गाडी थांबविण्यात आली.
Panaji Video
Panaji Video Dainik Gomantak

Viral Video Panaji: गोव्यात पर्यटकांची हाणामारी हा विषय तसा काही नवीन राहिलेला नाही. तसेच, गोव्यातील स्थानिक आणि बाहेरून येणारे पर्य़टक यांच्यात देखील वाद आणि धरपकड झाल्याचे अनेक प्रकार अधुनमधून समोर येत असतात.

दरम्यान, गुरूवारी (दि.12) रात्री दहा वाजता बालभवन, पणजी (Panaji) येथे एक गोवेकर आणि एक पर्यटक (Goan And Tourist Fight) यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यामुळे अर्ध्या तासाहून अधिक काळासाठी वाहतूक खोळंबली. दोघांची वाहने रस्त्याच्या मधोमध असल्याने इतर वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

Panaji Video
Babush Monserrate विरुद्धची बलात्कार खटला सुनावणी ३ फेब्रुवारीपर्यंत तहकूब

या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये पर्यटक आणि गोवेकर व्यक्ती एकमेकांशी भांडताना तसेच, फटके देताना दिसत आहेत. तर, एक व्यक्ती हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहे.

या वादात दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध उभी केल्याने दोन्ही बाजूची वाहतूक अर्ध्या तासांहून अधिक काळासाठी खोळंबळी होती. तसेच, यावेळी अनेक बघ्यांची गर्दी देखील झाली होती.

Panaji Video
Ponda: रेल्वे तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी दोघांना अटक; 2.5 लाखांची ई-तिकिटे जप्त

दोघांमधील वाद शिगेला पेटला आणि गोवेकर तरूणाने व इतर लोकांनी पर्यटक व्यक्तीला थांबण्यासाठी भाग पाडले. विशेष म्हणजे रस्त्याच्या शेजारी लावलेला बॅरिगेटरच रस्त्याच्या मधोमध लावण्यात आला व या पर्यटक व्यक्तीची गाडी थांबविण्यात आली. अखेर या व्यक्तीने तिथेच गाडी उभी केल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली.

दरम्यान, यावरून तरूणाने पणजी पोलिसांना (Panaji Police) संपर्क करून घडलेली हकीकत सांगितली व त्यांना घटनास्थळी येण्याची विनंती केली. चारचाकीतील पर्यटकाच्या गाडी त्याच्या दुचाकीला धडक दिली तसेच, त्याचा जाब विचारला म्हणून मारहाण देखील केली असा आरोप या तरूणाने केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com