Calangute परीसरात घराला भीषण आग; प्रापंचिक साहित्य खाक

अग्निशामक दलास पाचारण केल्याने अनर्थ टळला
Fire Calangute
Fire Calangute Dainik Gomantak

आज सकाळच्या सुमारास कळंगुट येथील एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये घरातील साहित्य जळाले असल्याची आहे. घटनेचे गांभीर्य ओळखत अग्निशामक दलास पाचारण केल्याने आग आटोक्यात आली आहे.

(A house in Calangute area has burned down)

Fire Calangute
Traffic Jam in Panaji : Ironman 70.3 साठी वाहतुकीत बदल; शहरात 'ट्रॅफिक जॅम'

मिळालेल्या माहितीनुसार आज कळंगुट परीसरातील मध्यवस्तीतीतील एका घराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग लागले घर सुनीता गोवेकर यांच्या मालकीचे असून या घटनेमध्ये सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले आहे.

आग लागल्यानंतर काही वेळातच अग्निशामक दल घटानास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. यामुळे इतर घरांमध्ये आग फैलावण्यापासून थांबवण्यात यश आले आहे. मात्र या घटनेत गोवेकर यांच्या घरातील प्रापंचिक साहित्य जळाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

Fire Calangute
Goa Court Order: ....तरीही वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार; जाणून घ्या गोवा न्यायालयाचा नवा आदेश

याबाबत स्थानिकांनी माहिती दिली की, सुरुवातीला या घरातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले होते. त्यानंतर घराजवळ गेल्यानंतर पाहिले तर घरातीचे छत जळत होते. यानंतर तातडीने अग्निशामक दलास याची माहिती दिली. त्यामूळे इतर घरांचा आगीपासून बचाव करण्यात आला आहे.

सुनीता गोवेकर यांच्या घराला लागलेल्या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून घटनेचा पंचनामा सुरु आहे. तसेच आगीचे नेमके कारण काय याचा शोध घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com