Nanus Fort : गोवा मुक्ती लढ्यातले क्रांतीवीर दीपाजी राणे यांचे नाणूस किल्ल्यावर होणार स्मारक

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाणूस किल्ल्याला भेट देत क्रांतिवीर दिपाजी राणे यांच्या कार्याला वंदन केले.
Memorial of Deepali Rane at Nanus Fort Goa
Memorial of Deepali Rane at Nanus Fort GoaDainik Gomantak

गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यासाठी इथल्या अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. त्यापैकीच एक म्हणजे क्रांतीवीर दिपाजी राणे. आज (26 जानेवारीला) प्रजासत्ताक दिनानिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाणूस किल्ल्याला भेट देत क्रांतिवीर दिपाजी राणे यांच्या कार्याला वंदन केले. (Memorial of Deepali Rane at Nanus Fort Goa)

Memorial of Deepali Rane at Nanus Fort Goa
Ganesh Jayanti 2023 : माघी गणेश जयंतीनिमित्त संपूर्ण मुरगाव तालुका भक्तिमय

26 जानेवारी 1852 रोजी नाणूस किल्ल्याच्या साक्षीने क्रांतीवीर दीपाजी राणे यांनी गोवा स्वातंत्र्य संग्रामात पहिली सशस्त्रक्रांती पोर्तुगिजांविरोधात सत्तरीत केली होती. युवापिढीला इतिहासाची जाणीव व्हावी आणि या क्रांतीची मशाल अनेकांच्या मनात सदैव तेवत राहावी,

यासाठी 26 जानेवारी हा दिवस सत्तरी इतिहास संवर्धन समितीतर्फे आज नाणूस किल्ल्यावर क्रांतिदिन साजरा करण्‍यात आला असून इथून पुढे दरवर्षी 26 जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात येणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

गोव्याच्या मुक्तीलढ्यात नाणूस किल्ल्याचे मोठे योगदान आहे. त्यामुळे किल्ल्यावर दीपाजी राणेंचे भव्य दिव्य स्मारक बांधून किल्ल्याचे पुनर्वसन करता येऊ शकते. दिपाजींचे स्मारक हे राष्ट्रीय स्मारक होऊ शकते. यावर काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नाणूस किल्ल्यावर दरवर्षी दिपाजी राणेंना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार असून आम्ही गोवा सरकार, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व खात्याद्वारे नाणूस किल्ल्याचा जीर्णोद्धार करण्याचे नियोजन केले आहे. परंतु यासाठी आम्हाला रस्ता आणि इतर सुविधांसाठी जमीन आवश्यक आहे. जर इथल्या नागरिकांनी जमीन दान केली, जमीन वापरण्यास परवानगी दिली तर हे काम सोपे होऊ शकते.

तसेच, दिपाजी राणे यांचे खुंभारखान येथील घर ऐतिहासिक वास्तू म्हणून पुनर्संचयित करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com