Police Warns Dog Owner: कुत्र्याला मोकाट सोडल्याने मालकाविरोधात पोलिसांत तक्रार

पोलिसस्थानकांत बोलावून समज देऊन सोडले; पुढच्यावेळी दंडात्मक कारवाईचा इशारा
Police Warns Dog Owner: कुत्र्याला मोकाट सोडल्याने मालकाविरोधात पोलिसांत तक्रार

Police Warns Dog Owner: हेडलँड सडा येथे रोटविलर जातीच्या कुत्र्याला गळ्यात पट्टा न घालता मोकाट सोडत असल्याने पोलिसांनी संबंधित कुत्र्याच्या मालकाला मुरगाव पोलीस स्थानकात बोलावून तंबी दिली. कुत्र्याला पुन्हा मोकाट सोडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला. याबाबत गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेच्या अध्यक्षांनी मुरगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

Police Warns Dog Owner: कुत्र्याला मोकाट सोडल्याने मालकाविरोधात पोलिसांत तक्रार
Vishwajit Rane: गोव्यात इको सेन्‍सेटिव्ह झोनला वाढता विरोध, फळदेसाईंनंतर वनमंत्री विश्वजीत राणेही मैदानात

हेडलँड सडा येथे लोफिस बार जवळून एमपीटी कॉटर्स दिशेने एक ज्येष्ठ नागरिक दररोज रात्री 8 ते 10 या दरम्यान आपल्या रोटविलर कुत्र्यासह फेरफटका मारतात. मात्र त्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा घातलेला नसतो. तर मोकाट सोडलेले असते. रोटविलर कुत्र्याचा चावा जीवघेणा ठरू शकतो. हिंसक स्वभावामुळे अनेक राज्यांमध्ये असे धोकादायक श्वान पाळण्यावर बंदी आहे.

हा कुत्रा मोकाट असल्याने आणि त्याने कुणाही माणसावर हल्ला केला तर मालकाला या कुत्र्याला नियंत्रित करणे खूप कठीण जाईल, अशी तक्रार मुरगाव पोलिसात करण्यात आली होती.

याची दखल घेऊन पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तसेच सुरक्षेच्या कारणास्तव गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेचे अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर यांना पोलिस स्थानकात बोलावून त्यांच्या कुत्र्याला सार्वजनिक ठिकाणी गळ्यात साखळी घालून फिरवावे अशी समज दिली. तसेच परत कुत्रा मोकाट आढळल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही दिला.

Police Warns Dog Owner: कुत्र्याला मोकाट सोडल्याने मालकाविरोधात पोलिसांत तक्रार
Mopa Airport: विमानतळ बांधकाम करणाऱ्या कंपनीकडून पगार देण्यास टाळाटाळ; 38 लाख रुपये देणे बाकी

जबाबदारी मालकाची

नवीन नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी पाळीव कुत्र्यांमुळे होणारी घाण साफ करण्याची जबाबदारी संबंधित मालकाची असणार आहे. पाळीव प्राण्यांमुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास जनावराच्या मालकाला दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल आणि जखमी व्यक्तीच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही तो उचलेल, असे नोएडा प्राधिकरणाने एका प्रकरणात स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com