Sal River : साळ नदीच्या मुखाकडील गाळाच्या उपशाचा प्रस्ताव

कॅप्टन ऑफ पोर्टस्‌ने नदीच्या मुखाकडे तात्पुरता गाळ उपसा करण्याचा प्रस्ताव आखला आहे.
Sal River
Sal RiverDainik Gomantak

Sal River : साळ नदीच्या मुखाकडे तयार झालेल्या वाळूच्या पट्ट्यामुळे जलवाहतुकीत येणारा व्यत्यय व त्यामुळे यांत्रिक मासेमारी हंगाम सुरू होऊनही पूर्ण संख्येने ट्रॉलर समुद्रात जाऊ न शकल्याने आता कॅप्टन ऑफ पोर्टस्‌ने नदीच्या मुखाकडे तात्पुरता गाळ उपसा करण्याचा प्रस्ताव आखला आहे.

परवा मासेमारी हंगामाच्या पहिल्या दिवशी या समस्येमुळे कुटबण जेटीवरील अवघेच ट्रॉलर मासेमारीला जाऊ शकले तर उरलेले नदीच्या मुखाशी अडकून पडले. नंतर भरतीच्या वेळी ते धक्क्यावर आणण्यात आले. त्यांच्या मालकांनी तसेच इतरांनी नंतर जाऊन आमदार क्रुज सिल्वा यांची भेट घेतली व ही समस्या सरकारच्या लक्षात आणून देण्याची विनंती केली.

Sal River
Festival of Goa : राय येथील प्रसिद्ध कणसांचे फेस्त उत्साहात संपन्न

नंतर जेम्स ब्रागांझा यांच्याकडे त्यांनी संपर्क साधला असता सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून तात्पुरते उपाय योजण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. त्यासाठी त्वरित एक ड्रेजर नदीत नेऊन वाळूचा पट्टा फोडून जलवाहतुकीसाठी वाट केली जाणार आहे. एका प्रश्नावर ते म्हणाले, ड्रेजर एक तर रस्ता वा सागरीमार्गे त्या जागी आणला जाईल व त्यासाठी विलंब होणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com