
Goa Accident : दाबोळी येथे झालेल्या अपघातात तीन जखमी तर अनेक वाहनांचे नुकसान झाले.आज शनिवारी दुपारी आल्तो दाबोळी येथे ट्रफिक सिग्नलजवळ वास्कोच्या दिशेने भर वेगाने जात असलेल्या एका टिप्पर ट्रकने ओम्नी, ब्रीझा, अॅक्टीव्हा दुचाकी आणि पाण्याच्या टँकरला जोरदार धडक दिली.
दैव बलवत्तर म्हणून यात तीनही वाहनांचे चालक किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने चिखली येथे उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी पाठवण्यात आले. आल्ल दाबोळी येथे सदर वाहने सिग्नलसाठी उभी होती. पाठीमागून भरवेगा आलेल्या ट्रकने या वाहनांना ठोकरले.
दरम्यान अल्कोहोल टेस्टींग सक्तीचे केले पाहिजे आणि विविध ठिकाणी पीसीआर व्हॅन आणि इंटेसेप्टर व्हॅन तैनात करण्याची गरज आहे. पोलिसांनी वारंवार त्यांचे स्पॉट बदलले पाहिजेत. ड्रंक अँड ड्राईव्ह आणि रॅश ड्रायव्हिंगच्या बाबतीत निष्काळजीपणाने वाहन चालवल्याने व त्यांच्या चुकांमुळे अपघात घडतात.
मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन आणि आज्ञा न पाळणाऱ्या विरुद्ध कडक वाहतूक मोहीम तीव्र करण्यासाठी प्राधिकरण आणि वाहतूक कक्ष आणि संबंधित विभागाने कडक धोरण अवलंबून अशा प्रकरणांमध्ये वाहने जप्त करावी आणि वाहनचालक परवाना दंडासह रद्द करण्याची शिफारस केली पाहिजे अशी मागणी होत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.