Aakasa Air: आता या शहरातून गोव्यासाठी थेट फ्लाईट सेवा सुरू; असे असेल वेळापत्रक

लखनऊ येथील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (CCSIA) उड्डाण करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आकासा एअरलाईनतर्फे नव्या उड्डाणांची घोषणा करण्यात आली आहे.
Lucknow-Goa Flight
Lucknow-Goa FlightDainik Gomantak

लखनऊ येथील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (CCSIA) उड्डाण करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आकासा एअरलाईनतर्फे नव्या उड्डाणांची घोषणा करण्यात आली आहे. गोवा हे देशातील महत्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. CCSIA वरून गोव्यासाठी फ्लाइट सुरू होणार आहे.

Lucknow-Goa Flight
Goa Assembly Session: वॉटरस्पोर्ट्समध्ये गोव्यासमोर मालवणचे मोठे आव्हान

आता गोवा आणि अहमदाबादसाठी दोन उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. आकासा एअरलाईनसह, विमानतळावर आता लखनऊला गोव्याशी जोडणाऱ्या तीन एअरलाइन्स आहेत, असे CCSI ने एका निवेदनात म्हटले आहे. एअरएशिया आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांचा त्यात समावेश आहे, असे त्यात म्हटले आहे.

Akasa Air लखनऊ ते अहमदाबाद अशी नवीन फ्लाइट सुरू करत आहे, विमानतळावरून त्यांची साप्ताहिक 35 उड्डाणे करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

लखनऊ विमानतळावरून गोव्याला जाणारी रोजची नॉन-स्टॉप फ्लाइट 14:15 वाजता आणि अहमदाबादसाठी 21:00 वाजता निघेल. लखनऊ विमानतळावरून दररोज 18,000 हून अधिक प्रवासी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा 128 हून अधिक फ्लाइट्समधून प्रवास करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com