घरोघरी राज्य सरकारच्या अपयशाची माहिती पोहचविणार; आप हाच सक्षम तिसरा पर्याय!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

आतिशी म्हणाल्या की, राज्य सरकार कोरोना संसर्ग वाढ रोखण्यासाठी विविध पातळीवर अपयशी ठरले आहे. दिल्ली आणि गोव्याचा विचार केला, तर दिल्ली सरकार दररोज २० हजार लोकांच्या स्वॅबच्या चाचण्या घेत आहे. त्याशिवाय कोरोना रुग्णांसाठी २०० रुग्णवाहिका ठेवल्या आहेत,

पणजी: राज्यात एकाच पक्षाचे सरकार अस्तित्वात नाही. जे सरकार अस्तित्वात आले आहे ते दोन पक्षांचे असल्यामुळे आम्ही त्याला ‘काँग्रेस जनता पक्षा‘चे सरकार म्हणून संबोधित आहोत. सर्व पातळीवर राज्य सरकार अपयशी ठरले आहे. येणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत आणि जर राज्याच्या भल्यासाठी चांगल्या विचारांचे कोणी पक्षात येत असतील तर त्यांचे आम्ही स्वागत करीत आहोत,  असे सांगत आम आदमी पक्षाच्या गोव्याच्या प्रभारी आतिशी मार्लेना यांनी गोव्यात ‘आप''हा तिसरा सक्षम पर्याय लोकांसाठी उपलब्ध असल्याचे नमूद केले.

 

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी काँग्रेसचे प्रवक्ते तथा नेते वाल्मिकी नाईक यांची उपस्थिती होती.

 

आतिशी म्हणाल्या की, राज्य सरकार कोरोना संसर्ग वाढ रोखण्यासाठी विविध पातळीवर अपयशी ठरले आहे. दिल्ली आणि गोव्याचा विचार केला, तर दिल्ली सरकार दररोज २० हजार लोकांच्या स्वॅबच्या चाचण्या घेत आहे. त्याशिवाय कोरोना रुग्णांसाठी २०० रुग्णवाहिका ठेवल्या आहेत, गोव्यात केवळ सहा रुग्णवाहिका ठेवल्या गेल्या आहेत, वास्तव आहे. गोव्यात स्वॅब चाचणीचे निकाल गतीने लागले असते तर एवढी रुग्णसंख्या वाढली नसती, कारण चाचणी घेतलेले लोक इतरत्र फिरत राहिली आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक झाल्याचे त्यांनी सांगितले. पाच दिल्लीतील सरकारने काय केले, जनतेने पाहिले आहे.

 

गोव्यात आम्ही सत्तेसाठी असलेल्या २१ जागा निवडून आणण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला नाकारले होते, काँग्रेसला जास्त जागा मिळूनही ते सत्तेत पोहोचले नाहीत. उलट त्यांनी आपले आमदार भाजपला विकले आहेत. त्यामुळेच राज्यात केवळ एक पक्षाचे सरकार नसून ते काँग्रेस-भाजपचे सरकार आहे, असे सांगत आतिशी म्हणाल्या की, प्रत्येक राज्यात आम आदमी पक्ष पुढील विधानसभेच्या दृष्टीने बांधणी करीत आहे.

 

राज्यातील सरकारच्या अपयशाचे विषय आम्ही जनतेच्या घरोघरी पोहोचविणार आहोत. पुढील निवडणुकीत आम्ही नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहोत, परंतु चांगल्या विचारांचे इतर पक्षात असलेले लोक जर आमच्याकडे येत असतील, तर आम्ही त्यांचे स्वागत करू असेही त्यांनी सांगितले. मागील निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा चेहरा तुम्ही दिला होता, यावेळी तसा चेहरा देणार काय, या प्रश्‍नावर त्यांनी येणाऱ्या काळानुसार ते निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या