आम आदमी पक्षाने  कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर 'आप'ला भाजपाची बी टीम असल्याचा खोटा आरोप केला

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 11 जानेवारी 2021

आम आदमी पक्षाने  कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर 'आप'ला भाजपाची बी टीम असल्याचा खोटा आरोप करून गोव्यातील जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला.

पणजी :आम आदमी पक्षाने  कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर 'आप'ला भाजपाची बी टीम असल्याचा खोटा आरोप करून गोव्यातील जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला.

पत्रकार परिषदेमध्ये  आपचे संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, कॉंग्रेस व भाजपा आधीच अघोषित आघाडीमध्ये असून त्याला जनता 'कांग्रेस जनता पार्टी' असे संबोधत आहे. कॉंग्रेस हे इंधना सारखे आहे, जे भाजपा पक्ष चालविण्यासाठी वापरते. जेव्हा जेव्हा भाजपाकडे सत्ता स्थापने साठी आमदार नसतात तेव्हा ते आमदार खरेदी करण्यासाठी कॉंग्रेसकडे पहात असतात. हे फक्त गोव्यातच नाही तर संपूर्ण भारतभरात सुरु आहे, मग ते मध्य प्रदेश असो, कर्नाटक किंवा मणिपूर असो.

'गोव्यातील या रूग्णालयांमध्ये मिळणार कोरोनाची लस'

"गिरीश स्वत: एका मुलाखतीत म्हणाले होते की कॉंग्रेस आपबरोबर युतीसाठी खुली आहे.आम्ही त्यांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर गिरीश यांनी आपवर बिनबुडाचे आरोप सुरु केले. हे आंबट द्राक्षांचे स्पष्ट प्रकरण आहे असे नमूद करुन म्हांबरे  म्हणाले,  कॉंग्रेसच्या सध्याच्या दोन आमदारांचे पुत्र भाजपात आहेत. 
म्हांबरे म्हणाले, "आप 'हा सध्या एकच विश्वासार्ह विरोधी आहे आणि आप ही गोव्याची 'ए' टीम आहे,जी काँग्रेस जनता पार्टीच्या म्हणजेच भाजपा आणि कॉंग्रेसमधील अघोषित निर्लज्ज युतीसारखी नाही.

 

 

 

संबंधित बातम्या