'गोवा मेजर पोर्ट अ‍ॅक्टच्या कक्षेतून वगळण्याची आम आदमी पक्षाने केली मागणी'

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

आम आदमी पक्षाने आज विविध बाबींमुळे ७ मार्चला होणाऱ्या गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावर जनसुनावणी तहकूब करण्याची मागणी केली.

पणजी : आम आदमी पक्षाने आज विविध बाबींमुळे ७ मार्चला होणाऱ्या गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावर जनसुनावणी तहकूब करण्याची मागणी केली आणि गोव्याला लहान राज्य असल्यामुळे मेजर पोर्ट अ‍ॅक्टच्या कक्षेतून वगळण्याची मागणीही केली.आप गोव्याचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी आज सांगितले की, राज्यात कोविडची प्रकरणे वाढत असल्याने जनजीवन धोक्यात येत आहे, यामुळे ७ मार्च रोजी होणारी जनसुनावणी नंतरच्या तारखेसाठी पुढे ढकलण्यात यावी.

त्याशिवाय त्यांनी असा युक्तिवाद केला की, काही पंचायतांना अद्याप गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडे प्राप्त झालेले नाहीत आणि म्हणूनच त्यावर अजिबात भाष्य करता येणार नाही. बहुतेक लोक नकाशे वाचू शकत नाहीत आणि नकाशे अभ्यासण्यासाठी आणि त्यांना समजून घेण्यासाठी त्यांना वेळ लागतो. तो वेळ दिला पाहिजे.

गोव्यातील पंचायत सचिव पदांसाठी होणारी लेखी परीक्षा येत्या रविवारी

या प्रक्रियेत लोकांचा सहभाग घेण्याबाबत जर सरकार खरोखरच गंभीर असेल, तर नकाशे काय आहेत हे सांगण्याबरोबरच लोकांना नकाशे समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल. जिल्हास्तराऐवजी तालुकास्तरावर जनसुनावणी घ्यावी. राज्यातील जनता संपूर्ण गोव्यातील लोकगोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याबद्दल  चिंता व्यक्त करीत आहेत, कारण त्यात अनेक विसंगती आहेत आणि म्हणूनच लोकांना योजनांचा अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ द्यावा, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या