आम आदमी पक्षाचे सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांचा राजीनामा

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

आम आदमी पक्षाचे माजी राज्य सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आजारपणामुळे ते सरचिटणीसपदावरून दूर झाले, नंतर तब्येत बरी झाल्यावर ते कार्यरत होतील अशी सर्वांची अटकळ होती.

पणजी : आम आदमी पक्षाचे माजी राज्य सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आजारपणामुळे ते सरचिटणीसपदावरून दूर झाले, नंतर तब्येत बरी झाल्यावर ते कार्यरत होतील अशी सर्वांची अटकळ होती.

त्यांनी आज अचानकपणे आपण आप चा राजीनामा दिल्याची माहिती दिली. त्यांनी राजीनामा देताना  त्यांनी म्हटले आहे, की 'पक्षाचे राज्य संयोजक राहूल म्हांबरे यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत. ते आणि त्यांचे सहकारी दिल्लीतील सहकाऱ्यांच्या मदतीने आता अधिक उत्तम काम करू शकतील असे मला वाटते. अलीकडे बदलच्या वातावरणामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी मी पार पाडू शकेन की नाही याविषयी मी साशंक होतो.' यावेळी पक्षाने काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले आहेत.

पाडगावकर यांनी राजीनामा दिल्याने त्यांनी ज्यांंच्यासोबत काम केले ते माजी राज्य संयोजक एल्विस गोम्स यांचा पुढील पवित्रा काय असेल याविषयी सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गोम्स यांच्या काळात स्थापन केलेल्या गट समित्यांची भूमिका काय असेल याकडेही राजकीय नजरा आहेत.

संबंधित बातम्या