'...तर कुंकळ्ळीतील प्रदूषणकारी कारखाने सहा महिन्यात हटवू'

आम आदमी पक्षाचे नेते प्रशांत नाईक यांचं आश्वासन
Aam Aadmi Party Prashant Naik

Aam Aadmi Party Prashant Naik

Dainik Gomantak

मडगाव : आगामी निवडणुकीत निवडून आल्यास कुंकळ्ळीच्या मतदारांना विश्वासात घेऊन कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत असलेले प्रदूषणकारी प्रकल्प सहा महिन्यात बंद करू आणि चांगले प्रकल्प कुंकळ्ळीत आणू, असे आश्वासन आम आदमी पक्षाचे नेते प्रशांत नाईक यांनी एका बैठकीत दिले.

Aam Aadmi Party Prashant Naik

Good Governance Index 2021: ‘सुशासनात’ गोवा तिसऱ्या स्थानावर !

कुंकळ्ळीत आजपर्यंत कित्येक आमदार झाले, त्यातील काहींनी स्वतःचे खिसे भरण्याइतके काम केले. काही आजी-माजी आमदारांनी (MLA) दर महिन्यांला हप्ता गोळा केला. तर काहींनी महागड्या गाड्याही बक्षिसी म्हणून घेतल्या. मात्र या सर्वांनी कुंकळ्ळीतील प्रदूषणाकडे पूर्ण दुर्लक्ष केले, असा निशाणाही त्यांनी साधला.

रात्रीच्या वेळी या परिसरात जाणे म्हणजे प्रदूषणकारी श्वास घ्यावा लागतो. या प्रदूषणकारी उद्योगांमुळे लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत असल्याचा दावाही नाईक यांनी केला. सर्व प्रदूषणकारी प्रकल्प बंद करण्यासाठी केवळ एकदा आम आदमी पक्षाला निवडून द्यावे. हे प्रदूषणकारी प्रकल्प कायम बंद करु, असे आश्वासन आपचे (Aam Aadmi Party) नेते नाईक यांनी दिले.

Aam Aadmi Party Prashant Naik

लवू यांचा MGP आणि TMC वर 'खळबळजनक' आरोप!

कुंकळ्ळी मतदारसंघात अनेकजण आगामी विधानसभा निवडणूक लढवू इच्छित आहेत, तर कित्येकांनी आपला स्वार्थ साधण्यासाठी पक्षबदल ही केले आहेत . काही जण पैशांचं वाटपही करत आहेत. हा पैसाही प्रदूषणकारी (Pollution) उद्योग चालवणाऱ्या उद्योजकांकडून येतो असे काही उद्योजकच सांगत आहेत. तेव्हा कुंकळ्ळीच्या मतदारांनी सर्व गोष्टींचा विचार करत मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Aam Aadmi Party Prashant Naik

मी कॉंग्रेसचा शिस्तबध्द सैनिक होतो; पण..

माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी हे प्रदूषणकारी उद्योग कुंकळ्ळीत आणले आणि एका माजी मंत्र्याने वीज चोरी प्रकरणातही येथून लाच खाल्ली, हे सर्व जगजाहीर आहे. हे सर्व प्रदूषणकारी उद्योग आप सहा महिन्यात बंद करणार. मात्र यासाठी कुंकळ्ळीतील मतदारांनी साथ देण्याचे आवाहन नाईक यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com