"वीजमंत्री निलेश काब्राल यांच्या हुकूमशाही वागणुकीचा निषेध"

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 5 एप्रिल 2021

आम आदमी पार्टीने आज वीजमंत्री व कुडचड्याचे आमदार निलेश काब्राल यांच्या हुकूमशाही वागणुकीचा निषेध करत निदर्शने केली आणि कुडचडे काकोड्याच्या नगराध्यक्षांविरोधात मांडलेला अविश्वास ठराव त्वरित मागे घेण्याची मागणी केली.

पणजी: आम आदमी पार्टीने आज वीजमंत्री व कुडचड्याचे आमदार निलेश काब्राल यांच्या हुकूमशाही वागणुकीचा निषेध करत निदर्शने केली आणि कुडचडे काकोड्याच्या नगराध्यक्षांविरोधात मांडलेला अविश्वास ठराव त्वरित मागे घेण्याची मागणी केली. आप पक्षाचे कुडचडे काकोड्याचे अध्यक्ष जेम्स फर्नांडिस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नुकत्याच झालेल्या निवडणुका म्हणजे जनतेचा विजय आणि काब्राल यांचा पराभव होय.

गोवा: ‘ते’ वादग्रस्त ट्विट कर्मचाऱ्यास भोवले 

त्यांनी निदर्शनास आणून दिले की, 5 नगरसेवकांना बिनविरोध निवडून आणण्याच्या काब्राल यांच्या दाव्याला परिसरातील लोकांनी परिषदेच्या सर्व प्रभागात उमेदवार उभे करून हाणून पाडले. बालकृष्ण होडारकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याने हे सिद्ध होते की, काब्राल यांनी पालिकेवरील नियंत्रण गमावले आहे. “निवडून आलेल्या नगरसेवकांना नगराध्यक्ष निवडून देण्याचा हक्क आहे,परंतु त्यांना नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी काब्राल यांनी धमकावले आहे,” ते म्हणाले.

गोवा विधानसभा: दलबदलू 10 आमदारांविरोधातील अपात्रता याचिकेवर सभापती देणार निवाडा 

काब्राल यांना नवीन नगरसेवकांना हुकूमशाही पद्धतीने मार्गदर्शन न करण्याचा सल्ला देताना ते म्हणाले की,लोकांच्या शांततेला गृहीत धरले जाऊ नये. नगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव त्वरित मागे घ्यावा. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबद्दल काब्राल काळजीत आहेत आणि म्हणून ते असे वागत आहेत, असे क्रिस्तानंद पेडणेकर म्हणाले.

संबंधित बातम्या