आम आदमी पक्षाची निदर्शने

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

आम आदमी पक्षाचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी स्थानिक ग्रामस्थांसह पेडणे तालुका पीडब्ल्यूडी कार्यालयासमोर पाणी पुरवठ्याच्या तीव्र समस्येसंदर्भात स्थानिकांना सोबत घेऊन निदर्शने केली.

पणजी :आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक राहुल म्हांबरे यांनी स्थानिक ग्रामस्थांसह पेडणे तालुका पीडब्ल्यूडी कार्यालयासमोर पाणी पुरवठ्याच्या तीव्र समस्येसंदर्भात स्थानिकांना सोबत घेऊन निदर्शने केली. आप'च्या वीज आंदोलनाच्या बैठकींच्या वेळी असे लक्षात आले की, लोकांना पिण्याच्या पाण्याशी संबंधित अनेक समस्या भेडसावत आहेत. ही समस्या केवळ तुयेतील लोकांची नाही तर भेट दिलेल्या इतर गावात सुद्धा अशीच पाण्याशी संबंधित समस्या आहे.
आमदार मोठ्या अभिमानाने सांगतात की त्यानी १ कोटी किंमतीचे शौचालय बांधले आहे. परंतु जर पाणीपुरवठाच नसेल तर त्या शौचालयाचा काय उपयोग? तसेच जलवाहिन्या अतिशय अरुंद व जुन्या आहेत ज्यांना वारंवार दुरुस्तीची आवश्यकता असते."  असे आपचे नेते अ‍ॅड.  प्रसाद शाहपोरकर म्हणाले.

गोवा सरकारने सर्वसामान्यांवर दरवाढ लादली"

“आम्ही गोवा मुक्तीच्या 60 व्या वर्षात आहोत. आमच्या राज्य सरकारला केंद्राकडून 300 कोटींचा निधी मिळतो तरी सुद्धा गोव्याची अवस्था काय आहे?  गोमंतकीयांना पिण्यासाठी योग्य पाणी मिळत नाही. आपण हे 300 कोटी रुपये इतर कार्यक्रम आणि कार्यावर खर्च करण्यापेक्षा  गोमंतकीयांना योग्य पाणीपुरवठा करा द्या”  असे राहुल म्हाबंरे म्हणाले.

संबंधित बातम्या