गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी आप पक्षाचा निषेध

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

आम आदमी पक्षाने आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी निषेध केला आणि म्हादई नदी गोव्याची जीवनवाहिनी असल्याचे ठणकावून सांगितले.

पणजी: आम आदमी पक्षाने आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी निषेध केला आणि म्हादई नदी गोव्याची जीवनवाहिनी असल्याचे ठणकावून सांगितले.

आप गोवाचे संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, गोवा आणि गोमंतकीयांचे हित प्राथमिक आहे आणि त्याबाबत कोणत्याही प्रकारची कुठलीही तडजोड होऊ शकत नाही. या विषयावर केंद्र सरकारकडे विचारणा करणाऱ्या सर्व पक्षीय शिष्टमंडळात 'आप'ला देखील सामील करून घ्यावे, अशी मागणी राहुल यांनी केली आणि डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यास सहमती दर्शविली आणि दिल्लीत ही भेट लवकरात लवकर ठरवण्यास सांगितले गेले.

आप पक्षाने मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधले की, त्यांनी आपल्या पक्षाच्या राजकारणासाठी म्हादई नदीचे बलिदान दिले आणि ते, पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मग भाजपचे सदस्य आहेत, असा युक्तिवाद केला. ते म्हणाले की, हे दुर्दैव आहे की म्हादईच्या पाण्याचे फेरफार व त्याचा गोव्यावर होणारा परिणाम याची तक्रार करून 18 वर्षानंतर उलटूनही , भूतकाळातील कांग्रेस व सध्याच्या काळातील भारतीय जनता पक्षाने म्हादईला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हादई गोंधळासाठी केवळ कांग्रेसला जबाबदार धरत असल्याबद्दल,राहुल यांनी त्यांना टोला लगावला आणि असेही निदर्शनास आणून दिले की, गेल्या आठ वर्षांपासून भाजप सत्ताधारी आहे आणि कांग्रेस इतकी वाईट आहे, तर मग त्यांनी कांग्रेसकडून आमदार का आयात केले, याविषयी विचारणा केली. "आज जलसंपदा मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्स आहेत, जे आधीच्या कांग्रेस सरकारमध्ये मंत्री होते.गोवा आणि गोव्याच्या हिताचा विश्वासघात कांग्रेसने केला, त्याच धोरणाचा अवलंब भाजप आता करीत आहे?" असे समजायला पाहिजे का,त्यांनी विचारले.

गोव्यातील ‘कोरोना’ प्रतिबंधक लसीकरणात गौडबंगाल! -

संबंधित बातम्या