गोवाः आप’चे ऑक्सिमित्र अभियान गतीने; लोकांना थेट घरपोच सेवा

दैनिक गोमंतक
रविवार, 2 मे 2021

आम आदमी पक्षाने ‘कोरोना विरोधी’ मोहिमेला बळकटी आणण्यासाठी ऑक्सिमीटर यंत्र नसलेल्या गृह अलगीकरणातील कोविडग्रस्तांना ऑक्सिमीटर पुरवणे सुरू केले आहे.

पणजी: आम आदमी पक्षाने ‘कोरोना विरोधी’ मोहिमेला बळकटी आणण्यासाठी ऑक्सिमीटर यंत्र नसलेल्या गृह अलगीकरणातील कोविडग्रस्तांना ऑक्सिमीटर पुरवणे सुरू केले आहे. ऑक्सिमित्र या अभियानाद्वारे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देणे सुरू केले आहे. याबाबत राज्याचे संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले, गृह अलगीकरणातील रुग्णांसाठी आवश्यक ऑक्सिमीटर त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे लोकांत भीतीचे वातावरण होते. या संदर्भात राज्यातील जनतेने ‘आप’शी संपर्क साधला व ही भीती दूर करण्यासाठी ‘आप’ने ऑक्सिमित्र अभियानाद्वारे त्यांना थेट घरपोच ऑक्सिमीटर प्रदान करण्याचे ठरवले. त्यानुसार हे अभियान गतीने सुरू आहे. (Aam Aadmi Party's Oximitra Abhiyan speeds up direct home delivery services)

‘आप’च्या डॉ. विभास प्रभुदेसाई यांनी नमूद केले, की गोव्यातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे, वाढत्या गृह अलगीकरणामुळे शासकीय आरोग्य केंद्रांकडे गृह अलगीकरणासाठीचे अत्यंत महत्त्वाचे आरोग्य किट संपत आहे. दररोज हजारो नवीन कोरोना रुग्ण वाढत आहेत. फार्मसी आणि मेडिकल स्टोअरमध्येही ऑक्सिमीटरचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे.

गोव्यातल्या डेस्टिनेश वेडिंगला लॉकडाऊनचा खो; गोवेकरांची लग्नंही लांबणीवर

प्रभुदेसाई म्हणाले, मागील वर्षी गोव्यातील पहिल्या लाटेवेळी सरकार प्रत्येक कोरोना बाधित व्यक्तीला सरकारी कोविड केंद्रात पाठवले जात होते. परिणामी, अपुऱ्या क्षमतेमुळे अनागोंदी निर्माण झाली होती ज्यामुळे कोरोना बाधित रूग्ण घरात किंवा तातडीने ग्रामीण स्तरातील केंद्रामध्ये कोणत्याही देखरेखीशिवाय किंवा उपचाराशिवाय अडकले होते. ‘आप’ने गोव्यात गृहविलगीकरण अंमलात आणण्यासाठी सरकारला यशस्वीरित्या विश्वास दिला व गृह अलगीकरणाची मागणी मान्य करवून घेतली. शेकडो अशा रुग्णांना आवश्यक असलेले ऑक्सिमीटर उपकरण देऊन सहकार्य केले. गेल्यावर्षी सुरू करण्यात आलेल्या कोरोना विरोधी मोहिमेत केवळ गोमंतकीय नव्हे, तर डॉक्टर, आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले व आपने केलेल्या कार्याचे कौतुक केले.

इंडियन मेडिकल असोसिएशनने जाहीरपणे आपल्या पत्रकार परिषदेत ‘आप’च्या या कार्याची प्रशंसा केली होती. डॉ. प्रभुदेसाई म्हणाले, ऑक्सिमीटर हे कोविड दरम्यान एखाद्याच्या फुफ्फुसाच्या कार्याचा मागोवा घेण्याचे एक अमूल्य साधन आहे. शरीरातील ऑक्सिजन (प्राणवायू) ची पातळी कमी होणे म्हणजे रुग्ण गंभीर होत चाललाय, याची आगाऊ सूचना होय. अशावेळी त्वरित रुग्णाला पुढील उपचारांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात भरती करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या