पालिका निवडणुकीत चांगल्या उमेदवारांना ‘आप’चा पाठिंबा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोजक्याच जागेवर उमेदवार दिले आहे. राज्यातील ११ नगरपालिका आणि पणजी महापालिका निवडणुकांत चांगल्या उमेदवारांना आम आदमी पक्ष पाठिंबा देणार आहे.

पणजी: जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोजक्याच जागेवर उमेदवार दिले आहे. राज्यातील ११ नगरपालिका आणि पणजी महापालिका निवडणुकांत चांगल्या उमेदवारांना आम आदमी पक्ष पाठिंबा देणार आहे. पक्षीय पातळीवर या निवडणुका झाल्यानंतर हा पक्ष आपले पॅनल उभे करेल, अशी माहिती आम आदमी पक्षाचे एल्विस गोम्स यांनी दिली.

गत विधानसभा निवडणुकीत मिळालेले अपयश मागे टाकत आता आम आदमी पक्षाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. यावर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने २१ उमेदवार दिले होते. परंतु ही निवडणूक कोरोनाच्या महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली. तर दुसरीकडे नगरपालिका निवडणुका पुढील महिन्यात होणार आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या