गोमंतकीयांची जमीन बळकावण्यासाठी 'कळंगुटचे शहरीकरण'

calangute
calangute

शिवोली: कळंगुटला (Calangute) शहरी दर्जा पंधरा वर्षांपूर्वीच प्राप्त झालेला होता, आपण फक्त त्या अधिसुचनेची कार्यवाही करण्याचा प्रयत्न करत आहे. या अधिसुचनेमुळे कळंगुटचा विकास आणि दर्जा उंचावणार असल्याचे कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो (Micheal Lobo) यांनी सांगितले. (AAP allegations on the issue of urbanization of calangute)

पोरबावाडो - कळंगुट येथे कळंगुट ग्रोईंग ग्रीन या उपक्रमाखाली आयोजित एका विशेष कार्यक्रमात स्थानिक शेतकऱ्यांना बी बियाणे तसेच सेंद्रिय खतांचे मंगळवारी  मोफत वाटप करण्यात आले. त्यावेळी मंत्री लोबो बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत कळंगुटचे सरपंच शॉन मार्टीन्स, माजी सरपंच एन्थॉनी मिनेझिस, जिल्हा पंचायत सदस्य दत्ताप्रसाद दाभोलकर, श्री बाबरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर  उपस्थित होते. 

यावेळी आपापल्या ओळखपत्रांसह उपस्थित राहिलेल्या खोब्रावाडो, उमतावाडो, माड्डोवाडो, तसेच तिवायवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना बियाणे तसेच सेंद्रिय खतांचे मंत्री मायकल लोबो तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चोडणकर यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले. कळंगुट गांव हरितक्रांतीखाली आणण्यासाठी स्थानिक शेतकरी तसेच ग्रामस्थांनी आपापल्या घरच्या बगिच्यात स्थानिक भाजीपाला उगविण्याचे आवाहन यावेळी मंत्री लोबो यांनी केले. या कामात शेतकऱ्यांना  प्रोत्साहित करण्यासाठी स्थानिक पंचायत तसेच आपले सदोदीत सहकार्य राहाणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. 

दरम्यान, कळंगुटला शहरी दर्जा प्राप्त झाल्याने गावची पंचायत मान्यता तशीच शाबूत राहाणार असल्याचे मंत्री लोबो यांनी यावेळी सांगितले. लोकसंख्येच्या मानाने कक्षा ओलांडलेल्या कळंगुटला शहरी दर्जा प्राप्त झाल्यास या भागातील स्वयंघोषीत व्यावसायिक तसेच इतरांना त्याचा अधिकाधिक फायदा होणार आहे. मात्र, त्यामुळे  भूखंड माफियांना वलय मिळण्याऐवजी चाप बसणार असल्याचेही त्यांनी आश्वस्त केले.

कळंगुटचे शहरीकरण करण्यामागे जमीन बळकावण्याचा हेतू

गोमंतकीयांची जमीन बळकावण्यासाठी आणि तेथील महामारीच्या काळात नफा मिळवण्यासाठी मंत्री मायकल लोबो आणि भाजपने कळंगुट गावाचे रूपांतरण ‘शहरी भागात’ केल्याबद्दल आम आदमी पक्षाने याचा निषेध केला 
आहे.
आम आदमी पक्षाचे (Aam Admi Party) राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी पत्रकात नमूद केले आहे, की, गोव्यात भाजप आधीच साथीच्या आजाराने त्रस्त असलेल्या गोमंतकीयांना लुबाडण्याचे नवीन मार्ग शोधत आहे. ताजी घटना म्हणजे कळंगुट गावाचे ‘शहरी भागात’ रूपांतर करणे म्हणजे गोवेकरांची जमीन हस्तगत करण्याच्या पहिल्या टप्प्याप्रमाणेच आहे, दलाल भू-माफियाशी संबंधित व्यवहार करतात आणि गोवेकरांना अडचणीत टाकून त्याचा फायदा घेतात. या हालचालीमुळे पुढे पाण्याची बिल वाढ, वीज प्रकरणे आणि गृह करात लक्षणीय वाढ होईल, अशा प्रकारे कठीण परिस्थितीमध्ये असलेल्या गोमंतकीयांवर समस्येच्या लाथा ते मारत आहेत. 

त्यांनी म्हटले आहे, की हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, कळंगुटसारख्या पर्यटन क्षेत्रामध्ये जेथे उत्पन्न पर्यटनाशी संबंधित आहे आणि टाळेबंदीमुळे आधीच ते तोट्यात आहे आणि शासनाच्या कठोर धोरणांमुळे त्यांना आधीच तोटा झाला आहे. गोवा देशातील कोविडचा सर्वात वाईट परिणाम झालेल्या राज्यांपैकी एक आहे. या रोगराईने अनेक गोमंतकीयांना वाईट स्थितीत सोडले आहे. संपूर्ण गोव्यात विजेसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीच वाढल्या आहेत, नव्हे तर इंधनाच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यामुळे सामान्य घरगुती वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. मध्यंतरी कळंगुटला ‘शहरी भागात’ रुपांतर करणे हा भाजपला भू-माफियांच्या माध्यमातून गोमंतकीयांची जमीन चोरण्याचा आणखी एक मार्ग आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com