AAP Allegation: रस्ते दुरुस्ती कामात तब्बल 15 कोटी रुपयांचा घोटाळा!

आपचा आरोप : कलम 2.2 चा गैरवापर; निविदा न काढताच केले काम
Road repair
Road repairDainik Gomantak

पणजी: पणजी आणि फोंडा (Panajim And Ponda) येथील रस्ते दुरुस्ती कामात 15 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. आपत्कालीन कामांसाठी असलेला (PWD) सार्वजनिक बांधकामाच्या कलम 2.2 चा गैरवापर करत या साबांखाने अवघ्या 50 लाख रुपयांचे काम निविदा न काढताच 15 कोटी रुपयांत करवून घेतले आहे. या कामात डांबरीकरणाचे काम करणारा कंत्राटदार आणि साबांखाचे प्रधान मुख्य अभियंता यांची मिलीभगत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) सरचिटणीस फ्रान्सिस कुएल्हो यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी वाल्मिकी नाईक, सेसिल रॉड्रिग्स, रुई मिनेझिस आणि प्रकाश मलानी उपस्थित होते.

कुएल्हो म्हणाले की, पणजी व फोंडा येथील रस्ता दुरुस्तीचे काम कंत्राटदाराच्या एकाच कुटुंबातील सदस्याला दिले. आपत्कालीन सेवेंतर्गत अवघ्या 50 लाखांच्या कामासाठी साबांखाच्या 2.2 या कलमाचा गैरवापर करण्यात आला. तसेच हे काम बिगर गोमंतकीय कंत्राटदाराला दिले असल्याने ते राज्याच्या धोरणाविरुद्ध असल्याची टीकाही आम आदमी पक्षाने केली.

Road repair
Tourism Revenue: पर्यटन विकास महामंडळ सुसाट, 14 कोटींचा नफा

गतवर्षी खड्ड्यांचा विषय गाजला होता, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व खड्डे बुजविले जातील, अशी घोषणा केली होती. त्यामुळे आपत्कालीन कामासाठी निविदा न काढण्याची तरतूद आहे. परंतु 50 लाखांचे काम दाखवून ते 12 कोटींमध्ये केल्याचे दाखविले. असे असतानाही साबांखाने पुन्हा एकदा तीन कोटी रुपयांची निविदा मे 2022 मध्ये काढली. म्हणजेच दोन्ही शहरांतील रस्ता दुरुस्तीसाठी साबांखाने संबंधित कंत्राटदाराला 15 कोटी रुपये दिल्याचे स्पष्ट होते, असे कुएल्हो म्हणाले.

केंद्रीय मंत्री अमित शहा गतवर्षी गोवा भेटीवर आले होते. त्यामुळे पोलिस विभागाने खड्डे, गतिरोधक आणि वाहतूक कोंडीमुळे सुरक्षेचे प्रश्‍न निर्माण केले होते. त्यासाठी रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याचे ठरले. त्यासाठी 50 लाख रुपये खर्च येणार होता. साबांखाने आपल्या नियमावलीच्या आपत्कालीन कलमाचा गैरवापर करत कंत्राटदाराच्या कुटुंबाला 12 कोटी रुपयांचे काम दिले. राज्यात उच्च दर्जाचे कंत्राटदार असतानाही हे काम केरळमधील कंत्राटदाराला देण्याचे कारण काय, असा सवालही कुएल्हो यांनी केला. या घोटाळ्याची चौकशी ईडी किंवा एसआयटीमार्फत करावी, अशी मागणी ‘आप’ने केली आहे.

Road repair
‘जांबावली’च्या मतदानास राज्याबाहेरील महाजनही पात्र

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com