AAP: मासेमारी क्षेत्रात बेकायदेशीर जलक्रीडा प्रकल्पाचा 'आप'कडून निषेध

करंजाळेतील रापणकारांना आम आदमी पक्षाचा पाठिंबा
AAP: मासेमारी क्षेत्रात बेकायदेशीर जलक्रीडा प्रकल्पाचा 'आप'कडून निषेध

ताळगावतील करंजाळे येथे मासेमारी (Fishing) क्षेत्रात बेकायदेशीर जलक्रीडा प्रकल्प सुरू करू नये अशी मागणी येथील पारंपारिक मच्छीमार आणि रापणकरांची असून यांच्या मागणीला आम आदमी पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे. या बेकायदेशीर जलक्रीडा प्रकल्पांवरून करंजाळे येथील रापणकार आणि पारंपारिक मच्छीमारांनी संताप व्यक्त केला आहे. आप शिष्टमंडळाने गुरूवारी यांची भेट घेतली. यावेळी मोहीम समितीच्या उपाध्यक्ष अलिना सालढाणा, उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक तसेच अन्य आप सदस्य उपस्थित होते.

AAP: मासेमारी क्षेत्रात बेकायदेशीर जलक्रीडा प्रकल्पाचा 'आप'कडून निषेध
UK Visa issue: ब्रिटिश ई-व्‍हिसा मुद्दा गृहमंत्री अमित शहांच्या दरबारात

गोवा विज्ञान केंद्र ते राजभवनपर्यंतचा किनारी भाग हा मांडवी नदी, जुवारी नदी आणि अरबी समुद्राच्या संगमाचा महत्त्वाचा बिंदू आहे. हा भाग सागरी जीवनाने समृद्ध असून कॅसिनो वा अन्य विकासप्रकल्पांमुळे प्रदूषित झालेल्या इतर क्षेत्रांच्या तुलनेत हे ठिकाण फारच कमी प्रदूषित आहे, असे वाल्मिकी नाईक म्हणाले.

हे ठिकाण मासेमारीचे महत्त्वाचे केंद्रबिंदू असून येथे जवळजवळ 25 प्रकारचे मासे मिळतात. शिवाय, करंजाळे येथील अनेकजण पिढ्यानपिढ्या मासेमारी करत आहेत. दोन हजारहून अधिक लोक उपजीविकेसाठी या पारंपारिक व्यवसायावर अवलंबून आहेत, अशी माहिती नाईक यांनी दिली.

कोणतीही परवानगी न घेता किंवा कोणत्याही संबंधितांना विश्वासात न घेता जलक्रीडा उपक्रम सुरू झाल्याचा अलिना सालढाणा यांनी निषेध व्यक्त केला.

AAP: मासेमारी क्षेत्रात बेकायदेशीर जलक्रीडा प्रकल्पाचा 'आप'कडून निषेध
Govt servants: बार्देश, सासष्टीत सर्वाधिक 'सरकारी बाबू', लोकसंख्येच्या तुलनेत सत्तरी अव्वल

जलक्रीडा उपक्रम सीमांकित भागपुरते मर्यादित आहे. या मासेमारी क्षेत्रात हा उपक्रम कसा सुरू झाला याची कोणत्याही विभागाला कल्पना नाही. या प्रकारचे उल्लंघन अस्वीकार्य आहे. मच्छीमार चरितार्थासाठी या क्षेत्रावर अवलंबून असून या प्रकल्पामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे, असे सालढाणा म्हणाल्या.

या अन्यायाविरूध्द लढण्यासाठी आपचा प्रयत्न असेल. हा विषय करंजाळे पुरते मर्यादित नसून या प्रकारच्या उपक्रमासाठी परवानगी दिली तर राज्यातील इतर पारंपारिक मासेमारी क्षेत्रही असेच धोक्यात येईल, अशी भीती सालढाणा यांनी व्यक्त केली.

केवळ गोव्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारताच्या किनारपट्टीवरील पारंपारिक मच्छीमारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी विविध चळवळी आणि मोहिमांचे नेतृत्व करणारे दिवंगत माथानी सालढाणा यांचा वारसा अलिना सालढाणा पुढे चालवत आहेत याबद्दल रापणकारांनी समाधान व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com